मुंबई : गणोशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून एसी डबल डेकर विशेष प्रिमियम ट्रेन सोडण्यात आली असून महागडय़ा ठरणा:या या ट्रेनला कोकणवासियांकडून उस्फुर्त प्रतिसाद देण्यात आला आहे. एलटीटी ते करमाळी धावणा:या या ट्रेनला चिपळूण आणि रत्नागिरीर्पयत चांगला प्रतिसाद मिळत असून ट्रेन हाऊसफुल्ल झाली आहे.
मध्य रेल्वेकडून एलटीटी ते करमाळी अशी विशेष प्रिमियम एसी डबल डेकर ट्रेन सुरु करण्यात आली आहे. 22 ऑगस्टपासून धावणा:या या ट्रेनच्या एकूण 20 फे:या होणार आहेत. प्रिमियम ट्रेनच्या तिकिटांच्या किंमतीत मागणीनुसार आणि आरक्षणाचा दिवस पुढे गेल्यास वाढत होत जाते. त्यानुसार एसी डबल डेकर प्रिमिय ट्रेनच्या तिकिटांच्या किंमतीतही वाढ होत आहे. मात्र तरीही त्याला कोकणवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 02005 या ट्रेनचे 22, 24 आणि 26 ऑगस्टचे आरक्षण 16 ऑगस्टपासून सुरु झाले. तर 28 ऑगस्टचे आरक्षण 18 ऑगस्टपासून सुरु करण्यात आले आहे.
या दिवसांत धावणारी एसी डबल डेकर ट्रेनचे तिकिट ठाणो ते चिपळूण, रत्नागिरीर्पयत उपलब्धच नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. तसेच 02006 ट्रेनचे 23, 25 ऑगस्टचे आरक्षण 16 ऑगस्टपासून आणि 27 ऑगस्टचे आरक्षण 17 ऑगस्टपासून सुरु करण्यात आले. या ट्रेनचेही चिपळूण आणि रत्नागिरीर्पयतचे या दिवशी आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. (प्रतिनिधी)
याबाबत कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले की, एसी डबल डेकरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र ही ट्रेन विशेष प्रिमियम ट्रेन असल्याने अनेकांना माहीतीचा अभाव आहे. शेवटचे ठिकाण असलेल्या करमाळीर्पयतची तिकिट उपलब्ध असून चिपळूण आणि रत्नागिरीर्पयत डबल डेकर ट्रेन हाऊसफुल्ल झाल्या आहेत. प्रिमियम ट्रेनमध्ये लांब पल्ल्याच्या ठिकाणांसाठी तिकिटांचा कोटा अधिक असतो. त्यामुळे करमाळीर्पयतची तिकिटे अधिक उपलब्ध असल्याचे विशेष प्रिमियम ट्रेनमध्ये दाखवले जाते. अनेक जण करमाळीर्पयतची तिकिटे काढूनही मधल्या स्थानकांवर उतरु शकतात.
एलटीटी ते करमाळीर्पयतच्या प्रवासासाठी 02005 या ट्रेनचे 22,24 आणि 02006 ट्रेनच 25 आणि 26 ऑगस्टसाठी 750 ते 850 र्पयत तिकिट उपलब्ध आहे.
प्रिमियम ट्रेनमध्ये लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी तिकिटांचा कोटा हा अधिक ठेवला जातो. मात्र याच दिवशी चिपळूण आणि रत्नागिरीर्पयतचे तिकिट काढण्याचा प्रयत्न केल्यास एकही तिकिट उपलब्ध नसल्याचे दाखवण्यात येते. सर्व स्थानकांसाठी तिकिटांची किंमत ही प्रिमियम ट्रेनसाठी एकच असते. मात्र जेवढी मागणी त्यानुसार आणि त्याच्या आरक्षणाचा दिवस वाढल्याने तिकिटांची किंमत वाढत जाते.
सध्या प्रवाशांना सुरुवातीला 1,055 रुपये एलटीटीहून जाताना आणि परतीसाठी 1,100 रु. मोजावे लागत आहेत. त्यानंतर तिकिटांची किंमत वाढतच जात आहे.
कोकण रेल्वेमार्गावर यंदा 198 गणपती स्पेशल
च्गणोशोत्सवात कोकणासाठी यावर्षी मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने एकत्रितपणो सर्वाधिक गाडय़ा सोडण्याचा विक्रम केला आहे. यावर्षी तिन्ही मार्गावरून कोकणात जाणा-या गणोशभक्तांसाठी आतार्पयत 198 गणपती स्पेशल गाडय़ा सोडण्यात येणार असून, यंदा यात 22 अतिरिक्त गाडय़ांची भर पडली आहे.
च्गणोशोत्सवात कोकणात जाणा-या प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने ज्यादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला. कोकणात जेवढय़ा गाडय़ा सोडल्या जातात त्या नेहमीच फुल्ल होत असल्याने दरवर्षी जादा गाडय़ांची मागणी वाढत आहे. ही स्थिती लक्षात घेता ‘मरे’, ‘परे’ आणि ‘कोरे’ने यंदा 198 गाडय़ा उपबल्ध करून दिल्या आहेत. गेल्यावर्षी याच मार्गावरून गणोशउत्सव काळात धावलेल्या जादा गाड्यांची संख्या 178 इतकी होती.
प्रवाशांसाठी सुविधा : एसएमएसवर नोंदवा तक्रार - कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी सेवेसंबंधित कोणतीही तक्रार आता 9क्क्447क्7क्क् या क्रमांकावर एसएमएस नोंदवता येणार आहे. बेलापूर येथील नियंत्रण कक्षातून या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाईल. कोकण रेल्वेच्या हद्दीतील कोलाड आणि ठोकूर या स्टेशनांदरम्यान प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
माणगावला रिझर्वेशन सेंटर : यंदा माणगाव येथे तिकीट रिझर्वेशन सेंटर (पीआरएस) सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 र्पयत या ठिकाणी तिकिटांचे आरक्षण करता येणार असून या तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
खाद्यपदार्थाचे इलेक्ट्रॉनिक बिल : कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना खाद्यपदार्थांचे इलेक्ट्रॉनिक बिल देण्याची सुविधा कोकण रेल्वेने सुरू केली आहे. सुरुवातीला एसी डब्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा उपलब्ध असेल. त्यानंतर अन्य डब्यांतही ती सुरू होईल. या बिलावर खाद्यपदार्थ खरेदी केल्याची तारीख, वेळ तसेच संबंधित कंत्रटदाराचे नाव आदी माहिती असणार आहे. अशा विविध सुविधांमुळे प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न असल्याचे कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितले.
कोकणचा प्रवास होणार सुखकर
मुंबई : मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याने कोकणात गणोशोत्सवानिमित्त जाणा:या चाकरमान्यांचा 26 ऑगस्टपासून प्रवास सुकर होणार आहे. याबाब 16 ऑगस्ट रोजी शासन आदेश काढण्यात आला आहे. यामुळे एसटी बसेस तसेच खाजगी बसेसचा प्रवास चांगला होणार आहे.
गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाताना अवजड वाहनांमुळे प्रवासात मोठा अडथळा होतो. यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्याबाबत मंत्रलयात बैठकही झाली. पनवेल ते सिंधुदुर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणो, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडीवरुन होणारी वाळू, रेती भरलेल्या ट्रकलाआणि मोठय़ा ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांना बंदीच घालण्यात आली आहे. ही बंदी 26 ऑगस्टपासून लागू करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
च्26 ऑगस्ट (00.01) ते 29 ऑगस्ट (20.00) या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना बंदी.
च्30 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालवधीत सकाळी आठ ते रात्री 20 वाजेर्पयत बंदी.
च्पाच दिवसांच्या गौरी गणपती विसर्जनानिमित्त 4 सप्टेंबर रात्री 20 वाजल्यापासून ते 6 सप्टेंबर सकाळी आठ वाजेर्पयत.
च्26 ऑगस्ट (00.01) ते 9 सप्टेंबर (24.00) या कालावधीत बंदी राहिल.