शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

हरकतींवर उद्या सुनावणी

By admin | Updated: November 3, 2016 00:32 IST

४ सदस्यीय प्रारूप प्रभागरचनेबाबत नागरिकांनी नोंदविलेल्या हरकतींवर शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या ४ सदस्यीय प्रारूप प्रभागरचनेबाबत नागरिकांनी नोंदविलेल्या हरकतींवर शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीसाठी राज्य निवडणूक आयोगाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांना प्राधिकृत केले आहे.बालगंधर्व रंगमंदिर येथे ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभागनिहाय ही सुनावणी घेतली जाणार आहे. प्रारूप प्रभागरचनेवर ४१ प्रभागांमधून ११०० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. त्या सर्व हरकतदारांना सुनावणीसाठी कार्यक्रमाची वेळ व ठिकाण पत्राने कळविण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ ते १० बाबत घेण्यात आलेल्या हरकतींवर सकाळी ११ ते ११.३० या वेळेत सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० ते २.३० या वेळेत प्रभाग क्रमांक ११ ते २०च्या हरकतींवर सुनावणी होईल. त्यानंतर दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत प्रभाग क्रमांक २१ ते ३० च्या हरकतींवर सुनावणी होणार आहे. प्रभाग क्रमांक ३१ ते ४१ च्या हरकतींवर दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता सर्वसाधारण हरकतींवर सुनावणी होणार आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने ७ आॅक्टोबर रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली. महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच ४ सदस्यांचा एक प्रभाग यानुसार पार पडणार आहे. प्रभागरचना तयार करताना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात हस्तक्षेप केला असून, प्रभागांची मोठ्याप्रमाणात मोडतोड करण्यात आल्याची टीका राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. प्रभागरचनेवर हरकती नोंदविण्यास सुरुवातीच्या टप्प्यात खूपच कमी प्रतिसाद मिळाला होता. सुरुवातीच्या १४ दिवसांमध्ये प्रभागरचनेवर ४०० हरकती नोंदविल्या गेल्या. शेवटच्या दिवशी मात्र एका दिवसात ७०० हरकती प्रशासनाकडे आल्या, त्यानंतर एकूण हरकतींची संख्या ११०० वर पोहोचली आहे. प्रशासनाला या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास त्या अभिप्रायांसह ही हरकत निवडणूक आयोगाकडे पाठविली जाणार आहे. या हरकतींशी प्रशासन सहमत नसल्यास त्याबाबतचा अभिप्राय हरकतींवर नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभागरचनेमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)>वेळेवर हजर न राहिल्यास निकालीप्रभागरचनेच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार संबंधित हरकतदारांनी वेळेवर हजर न राहिल्यास किंवा अनुपस्थित राहिल्यास त्यांची हरकत लगेच निकाली काढली जाणार आहे. त्यावर पुन्हा सुनावणी घेणे शक्य होणार नाही, असे महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.>सुनावणीसाठी बोलावलेच नसल्याची तक्रारप्रारूप प्रभागरचनेवर हरकत नोंदविलेल्यांना वैयक्तिक पत्र पाठवून हरकतीचा दिनांक, वेळ व ठिकाण कळविले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असले, तरी बहुसंख्य हरकतदारांना याबाबतचे निमंत्रण मिळाले नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हरकतीसाठी निमंत्रण मिळाले नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.