शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल आॅनलाइन भरण्याकडे कल

By admin | Updated: May 4, 2016 02:36 IST

महावितरणने संकेतस्थळावरून आॅनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिल आॅनलाइन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. राज्यभरातील महावितरणच्या ग्राहकांनी

मुंबई : महावितरणने संकेतस्थळावरून आॅनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिल आॅनलाइन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. राज्यभरातील महावितरणच्या ग्राहकांनी आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये तब्बल ३ हजार ४८२ कोटी ५८ लाख रुपयांची वीजबिले आॅनलाइन भरली आहेत. आॅनलाइन सुविधेमुळे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी यात तब्बल १ हजार ५६१ कोटींची वाढ झाली आहे.वीजबिल भरण्याची व्यवस्था घरबसल्या व्हावी, म्हणून इंटरनेटद्वारे महावितरणच्या संकेतस्थळावर आॅनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा लघुदाब वीजग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१४-१५ साली महावितरणच्या वीजग्राहकांनी १ हजार ९२० कोटी ८८ लाख रुपयांची वीजबिले आॅनलाइन भरली होती. या तुलनेत २०१५-१६ मध्ये वीजग्राहकांनी तब्बल ३ हजार ४८२ कोटी ५८ लाख रुपयांची वीजबिले आॅनलाइन भरली. वर्षभरातच आॅनलाइन वीजबिले भरणा प्रक्रियेत १ हजार ५६१ कोटी ७० लाखांची वाढ झाली आहे. वीजबिले आॅनलाइन भरण्यात आघाडीवर असलेल्या पुणे, भांडुप व कल्याण परिमंडलात २०१५-१६ मध्ये तब्बल २५०-३०० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. वर्षभरात पुणे ८६० कोटी, भांडुप ७४७ तर कल्याण परिमंडलात ५५१ कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. शिवाय, आतापर्यंत वार्षिक ९० कोटीपर्यंत आॅनलाइन भरणा होत असलेल्या नाशिक परिमंडलात २७१ कोटी, नागपूर ११८ कोटी, कोल्हापूर १३५ कोटी, बारामती १५१ कोटी आणि औरंगाबाद परिमंडलात १२५ कोटी रुपयांची वीजबिले आॅनलाइन भरण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)मागील वर्षी महावितरणने मोबाइल अ‍ॅपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली. त्यांचा ग्राहकांनी लाभ घेतला. २ लाखांपेक्षा अधिक युजर्सनी हे अ‍ॅप डाउनलोड केले असून, त्यांनी याद्वारे सुमारे १९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची वीज बिले भरली आहेत.लघुदाब वीजग्राहकांसाठी आॅनलाइन बिलासह इमेलद्वारे वीजबिलाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या ईमेलचा पर्याय स्वीकारल्यास ग्राहकाला दरमहा तीन रुपये सूट दिली जाते.वीजबिल आॅनलाइन भरण्यासाठी क्रेडिट, डेबिट किंवा नेटबॅकिंगचा पर्याय उपलब्ध आहे. वीजबिल भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.मुदतीनंतर भरलेल्या बिलाची पावती महावितरणच्या संबंधित कार्यालयात दाखवल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळता येईल.