शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो लागवड क्षेत्रात दीड पटीने वाढ!

By admin | Updated: August 31, 2015 01:20 IST

३0 लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन; उत्पादकांना मात्र फटका.

ब्रह्मनंद जाधव / मेहकर (जि. बुलडाणा): मागील तीन वर्षात राज्यात टोमॅटो उत्पादनाचे क्षेत्र ५0 हजार हेक्टरच्यावर पोहचले असून, लागवड क्षेत्रात जवळपास दीड पटीने वाढ झाली. यावर्षी व्यापार्‍यांनी अतिशय कमी भावात खरेदी केल्यामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील पीक क्षेत्रातील सुमारे २९ हजार ११0 हेक्टर क्षेत्र हे टोमॅटो लागवडीखाली येत होते. गत सहा वर्षात टोमॅटोच्या या क्षेत्रात जवळपास दीड पटीने वाढ होऊन हे क्षेत्र ५0 हजार हेक्टरच्यावर पोहचले आहे. राज्यात सन २00९ मध्ये ७ लाख ३२ हजार, २0१0 मध्ये ११ लाख १२ हजार व २0११ मध्ये ७ लाख ३८ हजार टन टोमॅटोचे उत्पादन घेण्यात आले होते. त्यानंतर टोमॅटोच्या उत्पादनात वाढ होऊन सन २0१२ मध्ये १0 लाख ७ हजार, २0१३ मध्ये १0 लाख ५0 हजार व २0१४ मध्ये १0 लाख ५0 हजार टन टोमॅटो उत्पादन घेण्यात आले. गत तीन वर्षात शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणावर टोमॅटो उत्पादन घेतले. यावर्षी टोमॅटोच्या भावात मोठी घसरण होत आहे. बाजारपेठेत टोमॅटोचे भाव प्रती किलो ५ रुपये मिळणेही अवघड झाले आहे. व्यापारी मात्र १५ ते २0 रुपये किलो प्रमाणे टोमॅटोची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. गत काही दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून, वातावरणातील या बदलाने काही भागात टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजारातही अडते व व्यापार्‍यांचे साटेलोटे असल्याने टोमॅटोला अपेक्षित भाव मिळत नाही. त्याचप्रमाणे तोडणी, दलाली व दळणवळणाचा खर्चदेखील मोठय़ा प्रमाणात असल्याने भाजीपाला उत्पादन तोट्यात आहे.