शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सवंग लोकप्रियतेसाठी टोलमाफीचा निर्णय

By admin | Updated: April 12, 2015 01:33 IST

राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घेतला आहे.अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

नाशिक : राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घेतला आहे. त्यातून लोकांना काही फायदा होईल, असे दिसत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.परदेशात चांगले रस्ते असून त्यासाठी टोल आकारण्यात येतो. मात्र, टोल आकारायचा नाही आणि दुसरीकडे बांधकाम खात्याला रस्ते दुरुस्तीसाठी जादाचा निधीही द्यायचा नाही, असे कसे चालेल. वाहनांना टोलमाफी मिळाल्याने रस्ते खड्डेमय होतील, त्यामुळे वेळ आणि इंधन जादा लागेल. खराब रस्त्यांमुळे शारीरिक आजारही जडतील, असे त्यांनी सांगितले.सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक विदेशी दौरे करण्याचा विक्रम करणाऱ्या पंतप्रधानांनी परदेशात करार करताना शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवावेत. सध्याच्या सरकारचे शेतकरी आणि शेतीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला. नैसर्गिक आपत्तीसाठीच्या समितीचा मी गेल्या दहा वर्षांपासून अध्यक्ष होतो. मात्र सध्याच्या समितीच्या बैठकीत नुकसानभरपाईसाठी काही मदत देण्याचा निर्णय झाल्याचे मला अद्याप समजलेले नाही. येत्या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारशी भांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील मुस्लीम समाज सर्व स्तरातील घटकांशी जुळवून घेत असून, पुरोगामी महाराष्ट्रात एमआयएम सारख्या पक्षांना थारा मिळणार नाही, असे पवार म्हणाले. चितळे समिती आणि अय्यंगार समितीच्या शिफारशीनुसार आधी दाखविण्यात आलेल्या पाण्याचे लाभक्षेत्र आताचे सरकार कमी दाखवित आहे. मात्र पाण्यावरील हक्क आम्ही अजिबात सोडणार नाही, अशी आग्रही भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. (प्रतिनिधी).च्महाराष्ट्र मराठी भाषिक राहण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्याच महाराष्ट्रात वेगळ्या विदर्भाची भाषा करणे चुकीचे आहे. शेवटी वेगळे राज्य करण्याचा निर्णय नेत्यांनी नव्हे, तर जनतेने घेतला पाहिजे. गोवा राज्य वेगळे करताना जनतेचे मतदान घेतले होते. च्गेल्या काही वर्षांचा विदर्भातील जनतेच्या निवडणुकांमधील कौल पाहता ते वेगळ्या विदर्भाच्या विरोधात असल्याचे आढळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देणार नाही. वेगळ्या विदर्भासाठी जनतेनेच निर्णय घ्यायचा असल्याचे पवार यांनी सांगितले.हेरगिरी नव्हे पंडित नेहरूंच्या काळात सुभाषचंद्र बोस यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे आताचे सरकार बोलत आहे. मात्र मी गृहमंत्री असताना माझ्यावरही पाळत ठेवण्यात येत होती. सार्वजनिक जीवनातील व्यक्ती व कुटुंबीयांच्या हितासाठी व संरक्षणासाठीच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येते. त्यात काहीही गैर नाही, असे काही नाही. त्यामुळे ही हेरगिरी नव्हे जबाबदारी असल्याचे पवारांनी सांगितले