शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी

By admin | Updated: August 23, 2016 17:30 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २३  : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन वळवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. आता कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणातील प्रमुख नेत्यांची आज मंत्रिमंडळासोबत बैठक झाली. या बैठकीत कोकणात जाणाऱ्या वाहनांवर आणि त्यांच्या सुरक्षेवर चर्चा केली.गेल्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्यात यावी, यासाठी मागणी केली जात होती. आता सरकारने यासंदर्भात निर्णय घेत कोकणात जाणाऱ्या गाड्यांना विशेष स्टिकर्स देण्याचं स्पष्ट केलं आहे.कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षेचा सरकार विचार करत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे ही वाहतूक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरुन वळवण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या या वाहनांना टोलमाफी दिली जाणार असून त्यांना विशेष स्टिकरच्या माध्यमातून ही सवलत दिली जाईल, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं. देर आए दुरुस्त आए कोकणवासीयांना टोल माफीबाबत नितेश राणेंची प्रतिक्रिया गणेशोत्सवात कोकणात जाणार्या भाविकांच्या वाहनांना मुंबई पुणे मार्गावर टोल माफी देण्याचा सरकारचा निर्णय यापूर्वीच घेण्याची गरज होती,  मात्र कोकणवासीयांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याने सरकारचा हा निर्णय म्हणजे देर आए दुरुस्त आए असा असल्याची प्रतिक्रिया टोल माफीसाठी प्रयत्न करणार्या कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे .राणे या मागणीसंदर्भात अठरा ऑगस्टला मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पत्र दिले होते.  ही मागणी मान्य न झाल्यास स्वत: टोल नाक्यावर उभे राहून कोकणात जाणार्या गाड्या टोल शिवाय सोडण्याचे आंदोलन करण्याचा इशारा आमदार राणे यांनी दिला होता.