मुंबई : कोल्हापूर शहरांर्तगत टोलची पुन्हा ५ ते १० रु पयांची दरवाढ झाली असून ती मागच्या सरकारच्या कराराप्रमाणे दर ३ वर्षांनी होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी सांगितले.कोल्हापूर शहरांतर्गत लावलेला टोल रद्द करण्यात यावा, अशी मागणी असताना उलट टोलच्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ झाल्याने बुधवारी विधानसभेत कोल्हापूरच्या आमदारांनी आक्र मक पवित्रा घेतला. आ. राजेश क्षीरसागर यांनी टोल रद्द करण्यासाठी आधीच सरकारने समिती नेमली असताना आता पुन्हा दरवाढ का, असा सवाल केला. निवडणुकीत टोल रद्द करणार आश्वासन दिल्याचे त्यांनी स्मरण करून दिले. आ. चंद्रदीप नरके यांनी टोलसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात असताना आताच्या दरवाढीसाठी सरकारने परवानगी दिली आहे का, असा प्रश्न केला आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. आमदारांची वेलमध्ये धाव कोल्हापुरचे आ. हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके आणि राजेश क्षीरसागर यांनी टोल दरवाढीवर आक्र मक होत वेलमध्ये धाव घेतली. राजेश क्षीरसागर यांनी वेलमध्येच काही वेळ बैठक मांडली. (विशेष प्रतिनिधी)
टोलदरवाढ कराराप्रमाणे
By admin | Updated: April 2, 2015 02:58 IST