मुंबई : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच या धामधुमीतच मुंबईत येणाऱ्या टोलच्या दरात ५ ते २0 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. १ आॅक्टोबरपासून या नवीन दराची अंमलबजावणी केली जाणार असून, त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानताच ऐन निवडणुकीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे काही प्रमाणात राजकीय पक्षांनाच फटका बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत फायदा मिळेल यादृष्टीने काही राजकीय पक्षांकडून टोलनाक्यांचा मुद्दा उचलण्यात आला आणि आपल्यामुळे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावाही केला. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीतच मुंबईत येणाऱ्या टोलनाक्यांच्या दरात ५ ते २० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) घेतला. मुंबईत येण्यास ऐरोली, वाशी, मुलुंड चेकनाका, मुलुंड जकात नाका व दहिसर असे पाच टोलनाके आहेत. या ठिकाणी दरवाढ होणार असल्याचे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डीग्गीकर यांनी सांगितले.
टोल महागला!
By admin | Updated: September 24, 2014 05:06 IST