शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील सर्व टोलनाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद

By admin | Updated: November 9, 2016 19:47 IST

राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सुरळीत होऊन जनतेला दिलासा मिळावा, यासाठी राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याची घोषणा मंगळवारी (दि.8) केल्यानंतर सर्वत्र नागरिकांनी एकच तारांबळ उडताना दिसत आहे. विशेष म्हणजे, टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य सरकारने टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य वाहनचालकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुली करण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील सर्व टोलनाक्यांवर टोल आकारणी करण्यात येणार नसल्याचे सांगितले. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सुरळीत होऊन जनतेला दिलासा मिळावा. यासाठी राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोल आकारणी न करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्र्यांनी केली असून एमएसआरडीसीच्या टोल कंत्राटदारांना त्याबाबतचे निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.