शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाला अपंग बहिणीला दिले ‘शौचालय’ भेट

By admin | Updated: August 31, 2015 12:40 IST

आजघडीला समाजामध्ये जाती-धर्मांचे प्रदंूषित वातावरण पसरले आहे. अशात या जातिभेदाच्या भिंती तोडून मानवतेचा संदेश देणारी आशादायी घटना शुक्रवारी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात घडली.

धर्माच्या भिंती तुटल्या : संदीप आवारी यांनी दिला मानवतेचा संदेशचंद्रपूर: आजघडीला समाजामध्ये जाती-धर्मांचे प्रदूषित वातावरण पसरले आहे. अशात या जातिभेदाच्या भिंती तोडून मानवतेचा संदेश देणारी आशादायी घटना शुक्रवारी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात घडली. दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका मुस्लिम मुलीची व्यथा ऐकून चंद्रपूर महापालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेना पदाधिकारी संदीप आवारी यांना तिला स्वखर्चाने शौचालय बांधून दिले. एका मुस्लिम बहिणीचे खऱ्या अर्थाने रक्षण करुन ‘या’ भावाने रक्षाबंधनाची आगळीवेगळी भेट दिली आहे.येथील इंदिरानगर भागात रुकसाना गनीशेख ही विधवा महिला मागील २२ वर्षापासून वास्तव्यास आहे. दोन मुलींचा विवाह झाल्याने त्या सासरी आहेत. तर उर्वरीत दोन मुली आणि एक मुलगा तिच्याजवळ आहेत. कमरजहाँ. या ३८ वर्षाच्या मुलीला जन्मापासून अपंगत्व आहे. त्यामुळे या मुलीच्या सर्व विधी आईलाच कराव्या लागत आहे. या मुलीसाठी घरी शौचालय बांधावे, असे वाटत होते. परंतु घरची आर्थिक विवंचना आड येत होती. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून ही वृद्ध महिला महापालिका, आमदार- खासदारांकडे गेली. पण मुस्लिम समाजासाठी शौचालयाची कोणतीही योजना नसल्याचे सांगून सर्वांनीच हात वर केले.पाच महिन्यांपूर्वी ही वृद्ध महिला पुन्हा महापालिकेत गेली. आयुक्तांना भेटली, पण नकारच मिळाला. त्यावेळी तेथे उपमहापौर असलेले शिवसेनेचे नेते संदीप आवारी पोहोचले. आयुक्तांनी त्यांना ही अडचण सांगितली. वृद्ध महिलेनेची करुण कहाणी ऐकताच आवारी यांच मन द्रवले. लगेच त्या महिलेला शौचालय स्वखर्चाने बांधून देण्याचा शब्द दिला. एरवी राजकारण्यांचा शब्द म्हणजे हवेतील तीर असतात. पण आवारी यांनी दिलेला शब्द पाळला. लगेच कंत्राटदारांशी संपर्क साधून बांधकामाला सुरुवात करण्यास सांगितले. आज हे शौचालय बांधून तयार झाले आहे. त्यामुळे रुकसाना अतिशय भावुक झाली आहे. एका गरीब बहिणीच्या मदतीला देवदूत धावून आल्याची भावना त्यांच्या मनात आहे. जातीपातीची बंधन तोडून केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेतून केलेले आवारी यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. रक्षाबंधनाच्या औचित्यावर एका भावाने दिलेली ही भेट या निर्धन बहिणीसाठी लाखमोलाची ठरली. तिने आवारी यांना राखी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त केली. मदत करणारे हात हिंदूचे की मुस्लिमाचे, हे आपण पाहात नाही. मदत करणारा हा नेहमीच धर्मांच्या पलिकडचा असतो, यावर या बहिणीचा विश्वास आहे. धर्मनिहाय गणनेवरुन देशात विखारी चर्चा सुरु असताना या घटनेने त्यावर विराम घालण्याचा प्रयत्न केला आहे. एका छोट्याशा शहरातील ही छोटीशी घटना असली तरी त्याचे मूल्य सर्वव्यापी आहे. (शहर प्रतिनिधी)