शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांची बांधकामे रखडली!

By admin | Updated: November 7, 2016 06:13 IST

शहर, गाव, खेडे आदींमध्ये लोकचळवळ ठरलेली हागणदारी मुक्ती व त्यामुळे उभ्या राहिलेल्या शौचालयाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील सुमारे १९ प्राथमिक शाळांना अद्यापही झाला नाही

ठाणे : शहर, गाव, खेडे आदींमध्ये लोकचळवळ ठरलेली हागणदारी मुक्ती व त्यामुळे उभ्या राहिलेल्या शौचालयाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील सुमारे १९ प्राथमिक शाळांना अद्यापही झाला नाही. त्यासाठी सर्व शिक्षा अभियानाव्दारे निधी मंजूर असतानाही बांधकामे अद्यापही रखडलेली असल्याचे प्राप्त अहवालावरून उघड झाले आहे. शहराप्रमाणेच गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या शाळेचा परिसर स्वच्छ व्हावा, त्यांना वेगवेगळ्या सोयी-सुविधा असाव्यात, त्यातून विद्यार्थ्यांना प्रसन्नता मिळावी म्हणून परिसर स्वच्छता, शाळेची रंगरंगोटी, डागडूजी करण्यासह विविध सोयी, सुविधांच्या पूर्ततेसाठी मोठा निधी सर्व शिक्षा अभियानाव्दारे मंजूर झाला आहे. आवश्यकता भासल्यास नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामांसाठीदेखील निधी मंजूर आहे. त्यात या शौचालयांच्या बांधकामांचादेखील समावेश आहे. ती अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थी -विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. दिवाळीच्या सुटीत तरी ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. हागणदारी मुक्ती व शौचालयाची सक्ती करून घरोघर निधी देखील दिला जातोय. विद्यार्थ्यांनी जनजागृतीव्दारे या कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप दिले. यानुसार प्रत्येक शाळेसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळेचा स्वच्छ परिसरत आणि शौचालये व मुतारीची सक्ती केली आहे. या करिता ठाणे जिल्हा परिषदेच्या १९ प्राथमिक शाळांसाठी खास निधीदेखील मंजूर आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करून या शाळांच्या रेंगाळलेल्या शौचालयांची कामे अद्यापही हाती घेतले नसल्याचे खासदारांच्या दिशा समितीच्या बैठकीव्दारे उघड झाले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नऊ तर विद्यार्थिनींच्या १० शौचालयांचा समावेश आहे.या शालेय शौचालयांसाठी १५ लाख ७७ हजार रूपयांचा निधी मंजूर आहे. या मंजूर रकमेतून अद्यापपर्यंत अंबरनाथ तालुक्यातील राहटोळी, वांगणी, भिनारपाड येथील शाळांसह भिवंडीच्या बापगांव, मनीचापाड, वरेत, पछापूर, नेवाडे या शाळांचे शौचालये बांधले नाहीत. याप्रमाणेच कल्याण तालुक्यातील खडवली शाळेसह मुरबाड तालुक्यातील वाडाचीवाडी, फांगूळगवान, सुकळवाडी येथील शौचालये बांधलेले नाही. (प्रतिनिधी)