शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवरीसोबत थर्माकोलचे शौचालयही!

By admin | Updated: July 12, 2015 21:53 IST

लोधवडेच्या सुपुत्राचा उपक्रम : निर्मल ग्राम अभियानाला कृतीची जोड

सचिन मंगरुळे - म्हसवड -मुलगी सासरी निघाली की तिला सर्व संसारोपयोगी साहित्य भेट देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. मात्र, जमाना बदलला आहे. आता ज्या घरी शौचालय नाही, अशा स्थळाला मुली नकार देतात. या पार्श्वभूमीवर आणि निर्मलग्राम स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागावा, या हेतूने माण तालुक्यातील लोधवडे येथील उद्योजक रामदास माने नववधूंना थर्माकोलची शौचालय मोफत भेट देणार आहेत.निर्मल ग्राम अभियान खेड्यापाड्यांत पोहोचावे, यासाठी शासनाकडून जनजागृती केली जाते. त्याला कृतीची जोड देण्यासाठी लोधवडे गावचे सुपुत्र व पुणे येथील उद्योजक रामदास माने यांनी नववधूंसाठी मोफत शौचालय, हा उपक्रम हाती घेतला आहे.शौचालयाचे महत्त्व पटल्यामुळे अनेक महिलांनी प्रसंगी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय बांधून घेतले. तर अनेक मुली लग्नाअगोदर सासरी शौचालय बांधण्याची अट घालतात. मात्र, नववधूला शौचालय भेट देण्याचा माने यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. माने यांचा थर्माकोल निर्मितीचा व्यवसाय आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील खेड्यांमध्ये २० हजारांहून जास्त शौचालये सवलतीच्या दरात वितरीत केली आहेत.