शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

युतीसाठी चर्चेची आज दुसरी फेरी

By admin | Updated: January 21, 2017 01:01 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेमध्ये युतीसाठी चर्चेची दुसरी फेरी शनिवारी दुपारी २ वाजता होणार आहे.

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेमध्ये युतीसाठी चर्चेची दुसरी फेरी शनिवारी दुपारी २ वाजता होणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी भेटण्याचे निश्चित करण्यात आले होते; मात्र त्यामध्ये बदल होऊन शनिवारी भेटण्याचे ठरले आहे. निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी किती जागा लढवायच्या हा युतीमधील कळीचा मुद्दा असणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेमध्ये युतीसाठी बोलणी सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची भेट घेऊन प्राथमिक बोलणी केली होती. त्यानंतर एकमेकांचे प्रस्ताव घेऊन पुन्हा भेटायचे ठरले होते. भाजपाकडून शहराध्यक्ष योगेश गोगावले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ व शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांच्यामध्ये युतीसाठी बोलणी होणार आहे. योगेश गोगावले यांनी पक्षाच्या सर्व आमदारांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजपा व शिवसेनेचे किती प्राबल्य आहे याची माहिती मागविली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मताधिक्क्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी युती व्हावी, अशी भाजपाची भूमिका आहे. शिवसेनेकडूनही त्यांना किती जागा हव्या आहेत, याचा प्रस्ताव भाजपाला दिला जाणार आहे. भाजपा व सेनेच्या युतीमुळे दोन्ही पक्षांमधील अनेकांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होत आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या तयारीने भाजपाने इतर पक्षांमधून आजी-माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला आहे. युती झाल्यास नेमक्या त्याच ठिकाणी शिवसेनेला उमेदवारी द्यावी लागणार आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश केलेल्या इच्छुकांमध्ये युतीची धास्ती निर्माण झाली आहे.>मुंबईतल्या युतीवर पुण्याची गणितेमुंबईत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपाने हात पुढे केला आहे. मात्र युती झाली तर ती संपूर्ण राज्यात व्हावी, अशी भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुण्यात भाजपाने शिवसेनेसोबत युतीसाठी बोलणी सुरू केली आहेत. मात्र मुंबईत युती न करण्याचा अंतिम निर्णय झाल्यास पुण्यातील शिवसेनेसोबतची बोलणी थांबविली जाईल. त्यामुळे मुंबईतल्या युतीवर पुण्यातील गणिते अवलंबून आहेत.