शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

आज रिक्षांचा एकदिवसीय संप, प्रवाशांचे मोठे हाल

By admin | Updated: August 31, 2016 12:11 IST

ओला, उबर यासह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी आणि तीन वर्षे झालेल्या लायसन्सधारक रिक्षाचालकांना बॅज देण्यात यावा

मुंबई : ओला, उबर यासह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी आणि तीन वर्षे झालेल्या लायसन्सधारक रिक्षाचालकांना बॅज देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईतील आॅटोरिक्षा चालकांनी बुधवारी संप पुकारला असून त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. आॅटोरिक्षा चालक व टॅक्सीमेन्स युनिअनने आज पुकारलेल्या संपात मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरांतील मिळून १ लाखांहून अधिक रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सातारा, लातूर, नांदेड येथे रिक्षा बंद ठेवतानाच चालकांकडून निदर्शनेही करण्यात येणार आहेत.

दरम्यान संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रशासनाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. जास्तीच्या बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत.  ओला, उबरसह खासगी टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून जय भगवान महासंघ आणि स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे.  मात्र १ सप्टेंबर रोजी परिवहनमंत्री यांनी चर्चेसाठी बोलावल्याने टॅक्सी संप मागे घेण्यात आला. मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून मात्र आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ आॅगस्ट रोजी संपाची हाक दिली होती. याबाबत युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, मुंबईत पूर्णपणे रिक्षा बंद ठेवल्या जातील. त्याचबरोबर पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथेही परिणाम जाणवेल. तर अन्य शहरांत निदर्शने केली जातील. आमच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार न केल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संप पुकारू. मागण्यांचे निवेदन बुधवारी दुपारी परिवहन आयुक्त यांना सादर केले जाईल, असे राव म्हणाले. मुंबईत होणाऱ्या संपात १ लाख ४ हजार रिक्षा सामील होतील. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवली आहे. मालवाहू वाहने तसेच इतर प्रवासी वाहने जसे बस व इत्यादीमधून बंद कालावधीत प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. बेस्ट आणि एसटी महामंडळाच्या बसही आवश्यकतेनुसार प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)