शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात उमेदवारीवरून आज पुन्हा घमासान

By admin | Updated: February 1, 2017 14:13 IST

पक्षाचे आमदार आणि काही प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रतिष्ठेच्या प्रश्नामुळे भाजपाची यादी रखडली.

नाशिक : पक्षाचे आमदार आणि काही प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रतिष्ठेच्या प्रश्नामुळे भाजपाची यादी रखडली. त्यातच पालकमंत्री गिरीश महाजन यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जळगावला लावे लागल्याने या पक्षाची उमेदवारी रखडली असून, अद्याप उमेदवारच घोषित करण्यात आले नाही. त्यामुळे माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणराय कोणालाच पावला नाही. आता बुधवारी महाजन यांच्या उपस्थितीत पुन्हा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून, त्या उमेदवारीवरून घमासान रंगण्याची शक्यता आहे. भाजपाच्या वतीने बुधवारीच पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे पक्षातर्फे अधिकृतरीत्या कळविण्यात आले आहे.भाजपाच्या उमेदवारीसाठी सुमारे सातशे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर २७ तारखेला पहिली यादी घोषित होईल, असे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले होते, मात्र अद्याप यादी घोषित नाही. यादीसंदर्भात सोमवारी रात्री पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक महाजन यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिटी सेंटर मॉल परिसरातील एका ठिकाणी घेण्यात आली. त्यात सर्वच पदाधिकारी आपापल्या समर्थकांसाठी अडून राहिल्याने कोणताही निर्णय होऊ शकला नाही. काही ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यमान नगरसेवक किंवा अन्य दावेदारांना शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप तसेच अन्य काही आमदारांनी शब्द दिले असून, अशावेळी उमेदवारीसाठी स्पर्धा वाढल्याचे वृत्त आहे. पंचवटीतील प्रभागात प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागुल उमेदवारी करीत असून, त्या प्रभागात दामोदर मानकर यांना उमेदवारीसाठी सानप यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. मात्र मखमलाबाद येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भेट देऊन गावातील वेगळा उमेदवार देण्याची मागणी केली आहे. त्यातून पेच निर्माण झाला आहे. पंचवटीत उत्तम उगले आणि जगदीश पाटील यांच्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. सिडको- सातपूर विभागात तर आमदार सीमा हिरे आणि आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे.