शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

‘लोकमत दीपोत्सव’ २०१४चे आज प्रकाशन

By admin | Updated: October 16, 2014 05:33 IST

गतवर्षी तब्बल एक लक्ष प्रतींच्या विक्रीचा टप्पा ओलांडून मराठी दिवाळी अंकांच्या शतकोत्तरी इतिहासात लोकमत समूहाच्या ‘दीपोत्सव’ने एक आगळी उंची गाठली

मुंबई: गतवर्षी तब्बल एक लक्ष प्रतींच्या विक्रीचा टप्पा ओलांडून मराठी दिवाळी अंकांच्या शतकोत्तरी इतिहासात लोकमत समूहाच्या ‘दीपोत्सव’ने एक आगळी उंची गाठली. यंदाचा बहुचर्चित दिवाळी अंक गुरुवारी (दि. १६) दुपारी मुंबईत प्रकाशित होत आहे.मराठी नाट्यसंमेलनाच्या नियोजित अध्यक्षा फैयाज, ख्यातकीर्त चित्रकार सुहास बहुलकर, ख्यातकीर्त नेत्र शल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने, सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर, झी चोवीस तास या वृत्तवाहिनीचे संपादक उदय निरगुडकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे कला अकादमी सभागृहात सायंकाळी चार वाजता हा सोहळा संपन्न होईल.डिजिटल इंडियाच्या बहुचर्चित प्रकल्पाबद्दल आपली भूमिका मांडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिल गेट्स यांच्याबरोबरच्या संपन्न सहजीवनाचा प्रवास उलगडून दाखवणाऱ्या मेलिण्डा गेट्स आणि प्रथमच मुखवट्याआडचा चेहरा दिसेल, इतक्या मोकळेपणाने दिलखुलास गप्पांची मैफील रंगवणारा शाहरुख खान हे या अंकातले काही बिनीचे मानकरी आहेत. रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे कला अकादमी सभागृहात गुरुवारी सायंकाळी चार वाजता होणाऱ्या ‘दीपोत्सव’च्या प्रकाशनाचा कार्यक्रम रसिकांसाठी खुला असून, या सोहळ्याला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत समुहाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)