शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आमदारकीसाठी आज मतदान

By admin | Updated: February 3, 2017 02:09 IST

कोकणच्या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या शिक्षक आमदारकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि

ठाणे : कोकणच्या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या शिक्षक आमदारकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७ हजार ६४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी ९८ मतदान केंदे्र आहेत. सेके्रट हार्ट हायस्कूल, सेक्टर ४, वाशी येथे ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार आहे. या मतदानाद्वारे निवडून येणारे आमदार सहा वर्षांसाठी विधान परिषदेत शिक्षकांचे नेतृत्व करणार आहेत. १० उमेदवारांपैकी एका योग्य उमेदवाराची निवड या वेळी मतदार करणार आहेत. ९८ पैकी ठाणे जिल्ह्यात २१ मतदान केंद्रांवर १५ हजार ७३६ मतदार मतदान करणार आहेत. याप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील २८ मतदान केंद्रांवर १० हजार नऊ मतदारांची व्यवस्था आहे. पालघर जिल्ह्याच्या १३ केंद्रांवर पाच हजार ११५ मतदार, रत्नागिरीच्या १७ केंद्रांवर चार हजार ३२८ मतदार आणि सिंधुदुर्गच्या १९ केंद्रांवर दोन हजार ४५६ मतदार मतदान करणार आहेत. त्याचप्रमाणे, या वेळी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या संघटना व नावासमोर त्या उमेदवाराचे छायाचित्र असणार आहे. यामुळे योग्य उमेदवाराला मतदान करणे मतदारांना शक्य होणार आहे.अंबरनाथ येथील तहसील कार्यालय आणि संजय गांधी ब्रँच हॉल, पहिला मजला येथे मतदान केंद्र आहे. याप्रमाणेच भिवंडी पोलीस कल्याण संकुल हॉल १ व २, सेतू केंद्राजवळ आणि प्री - प्रायमरी विद्यामंदिर मराठी जि.प. शाळा, वज्रेश्वरी येथे देखील केंद्र आहे. कल्याण येथील सेंट्रल रेल्वे ज्युनिअर कॉलेज, मुरबाड रोड कल्याण येथेही मतदान केंद्र असून डोंबिवली परिसरातील साउथ इंडियन हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोपर रोड, शास्त्रीनगर रूम नंबर १, २ येथे मतदान केंद्र आहेत. (प्रतिनिधी)या ठिकाणीही आहेत केंद्रे- मुरबाडच्या तहसील कार्यालयात मतदान केंद्र असून शहापूर तहसील कार्यालय व जि.प. शाळा, शेणवे या ठिकाणी मतदान केंद्र आहे. ठाणे येथे तलाठी कार्यालय, पाचपाखाडी नौपाडा, ठाणे तहसीलदार कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, ठाणे तहसील कार्यालय आवार येथे केंद्र आहेत. भार्इंदरच्या सेकंडरी स्कूल, तर नवी मुंबईच्या तुर्भे येथील नवी मुंबई म्युनिसिपल स्कूल, सेक्टर २४ आणि उल्हासनगर येथे रूम नंबर ३६, न्यू इरा हायस्कूलमध्ये मतदान केंदे्र आहेत.