शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

नागपूर-अमरावतीसाठी आज मतदान

By admin | Updated: June 20, 2014 00:58 IST

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी २० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

प्रशासन सज्ज : पदवीधरचे १४ तर शिक्षकचे १७ उमेदवार भाग्य आजमावणारनागपूर/अमरावती : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी २० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये १४ आणि शिक्षक मतदारसंघामधील १७ उमेदवारांमध्ये रस्सीखेच आहे.नागपूर विभागातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी सहा जिल्ह्यातील एकूण २ लाख ८७ हजारावर पदवीधर मतदार त्यांचा प्रतिनिधी निवडण्यासाठी ३१७ मतदान केंद्रांवर मतदान करतील. त्याकरिता प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि कामगार यांना मतदान करता यावे म्हणून चार तासाची सुटी देण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर व्हीडीओ कॅमेरे लावण्यात येणार आहे. २४ तारखेला नागपूर येथे प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये मतमोजणी होणार आहे.नागपूर विभागातील नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमिळून पदवीधर मतदारसंघ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे बबन तायवाडे, भाजप-सेना युतीचे प्रा. अनिल सोले, अपक्ष किशोर गजभिये आणि महेंद्र निंबार्ते या चार प्रमुख उमेदवारांसह एकूण १४ जण रिंगणात आहेत. एकूण २ लाख ८७ हजार ६२२ मतदार असून त्यांच्यासाठी विभागात ३१७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चार ते पाच अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण १५०० कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहे. मतदान पसंतीक्रमानुसार होणार असून मतदारांना नकारात्मक मतदानाचा(नोटा) पर्यायही देण्यात आला आहे.एकूण ३ लाख ५० हजार मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत. भंडारा जिल्ह्यासाठी २७०००, गोदिंया जिल्ह्यासाठी २२०००, वर्धा ३४०००, चंद्रपूर ४५०००, गडचिरोली १६००० आणि नागपूर जिल्ह्यासाठी २ लाख ४ हजार मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत. याशिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे २ हजार मतपत्रिका राखीव ठेवण्यात येणार आहे.सोले यांच्यासाठी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर तायवाडे यांच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सभा घेतल्या. अपक्ष किशोर गजभिये यांना बसपाने पाठिंबा जाहीर केला. प्रचार करताना उमेदवारांनी स्थानिक नेटवर्कवर भर दिला. मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी हायटेक यंत्रणेचा वापर करण्यात आला.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटनेचे उमेदवार शेखर भोयर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूण शळके, शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे, विद्यमान आमदार वसंतराव खोटरे, कॉग्रेस-राष्ट्रवादीचे प्रकाश तायडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे रामदास बारोटे, भारिप -बहुजन महासंघ पुरस्कृत संतोष हुसे, मराशिपचे श्रीकृष्ण अवचार, इन्साचे सुभाष गवई, लोक भारती पक्षाच्या वर्षा निकम, विजय गुल्हाने, रवींद्र मेंढे, नरहरी अर्डक, जयदीप देशमुख, सर्जेराव देशमुख, अजमल युसूफ खान, गुलाम अहमद अमानुल्ला खान असे एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मागील ६ जूनपासून या निवडणुकीच्या प्रचार रंगत आली. अमरावती विभागातील ७१ मतदान केंद्रांवर ४४ हजार ६२८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांतील ४४ हजार ६२८ मतदार आहेत. तेवढ्याच मतपत्रिका आणि १० टक्के राखीव अशा ४९ हजार ९० मतपत्रिका मतदान प्रकियेसाठी उपयोगात आणल्या जाणार आहेत. प्रत्येक मतदाराला आयोगाने पुरविलेल्या स्केच पेनद्वारेच पसंतीक्रम मतदारांना लिहावा लागणार आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर दोन स्केच पेनची पाकिटे पुरविण्यात आली आहेत. या निवडणुकीतील १७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतदार करणार आहेत. (प्रतिनिधी)