पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा गुरुवारी सायंकाळी पुण्यात होत आहे़ टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे़ मागील महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या करिष्माच्या जोरावर मनसेने २९ जागा जिंकून सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला होता़ पण, गेल्या वर्षभरात मनसेमधील अनेक विद्यमान नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे़ या निवडणुकीसाठी पक्षाने तयार केलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन अजूनपर्यंत झाले नसून ते ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे़ पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यास राज ठाकरे गुरुवारच्या सभेत काय बोलणार याकडे मनसे समर्थकांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)
राज ठाकरे यांची आज सभा
By admin | Updated: February 16, 2017 03:36 IST