शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजकालच्या नेत्यांची लायकी नाही

By admin | Updated: July 5, 2015 03:25 IST

देशात आता असे राजकारणी नाहीत की पुढील ५० वर्षांनंतरच्या इतिहासात त्यांचे नाव घ्यावेसे वाटेल. तेवढी आजकालच्या नेत्यांची लायकीदेखील नाही, असा टोला शिवसेना

मुंबई : देशात आता असे राजकारणी नाहीत की पुढील ५० वर्षांनंतरच्या इतिहासात त्यांचे नाव घ्यावेसे वाटेल. तेवढी आजकालच्या नेत्यांची लायकीदेखील नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कुणाचाही थेट नामोल्लेख न करता लगावला आहे. दादर येथील बालमोहन विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शाळेतील ८वीच्या ४०० विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टॅबचे मोफत वाटप करण्यात आले. उद्धव हे बालमोहन शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. यावेळी समोर लावलेल्या स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या तसबिरींकडे अंगुलीनिर्देश करीत उद्धव म्हणाले की, माझ्यासमोर बसलेल्या या विद्यार्थ्यांना पुढील ५० वर्षांनंतर नाव घ्यावेसे वाटेल असा राजकारणी नाही. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाले पाहिजे. न्यायालयाने तसे निष्कर्ष नोंदवले आहेत. हे ओझे कोण कमी करणार, याची वाट न पाहता मी सुरुवात केली आहे. या वेळी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते. ‘नवनीत’चे अमित गाला यांनी टॅब कसा हाताळावा त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग आणि पालकांनीही उपस्थिती दर्शवली होती. (विशेष प्रतिनिधी)