शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मांढरदेवीची आजपासून यात्रा

By admin | Updated: January 11, 2017 02:25 IST

महाराष्ट्रात प्रसिद्ध मांढरदेव काळूबाईदेवीची बुधवारपासून यात्रा सुरू होत आहे. पुढील तीन दिवस दि. ११, १२ व १३ जानेवारीपर्यंत यात्रा असून, प्रशासन सज्ज झाले आहे.

भोर : महाराष्ट्रात प्रसिद्ध मांढरदेव काळूबाईदेवीची बुधवारपासून यात्रा सुरू होत आहे. पुढील तीन दिवस दि. ११, १२ व १३ जानेवारीपर्यंत यात्रा असून, प्रशासन सज्ज झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवून साईडपट्ट्यांची कामे, सूचनाफलक, अतिक्रमणे काढून रंगरंगोटी करण्यात आली आहे. पशुसंर्वधन विभाग, आरोग्य, एसटी महामंडळ, महसूल विभाग यांनी तयारी केली असून २४ तास नियंत्रण कक्ष असेल.महसूल विभागाच्या ६ पथकांची नेमणूक करण्यात आली असून, चार ठिकाणी वाहनतळ करण्यात आला आहे. यात्राकाळात देव, देव्हारे, कोंबडी, बकरी नेण्यास व पशुहत्या करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर प्रशासनाची करडी नजर राहील.भोर-मांढरदेवी रस्त्यावरील खड्डे बुजविणे, साईडपट्ट्या भरून घेणे, दिशादर्शक फलक लावणे, खासगी जीपगाड्यांचे थांबे बाजूला करून सदरील रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढून रस्ता वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. पुलांची दुरुस्ती, घाटरस्त्याचे रुंदीकरण करून रिफ्लेक्टर बसवून रंगरंगोटी व फलक लावण्यात आले आहेत.यात्राकाळात भोर आगाराकडून जादा एसटी बस भाविकांसाठी सोडण्यात येणार आहेत. बस चालक, वाहक निर्व्यसनी ठेवण्यात येणार आहेत. बसमधून ढोलताशा, कोंबडी, बकरी नेता येणार नाहीत. आरोग्य विभागाकडून मांढरदेवी रोडवरील ११ गावांतील विहिरींचे पाणी शुद्धीकरण करून घेण्यात आले आहे. भोर-मांढरदेवी रस्त्यावर हॉटेल, ढाब्यांतील शिळे अन्न न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंबडखिंड घाटपायथ्याला विजेची, पाण्याची सोय करून वाहनतळ, आरोग्य सुविधा २४ तास ठेवण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून बकरी, कोंबडी घेऊन जाणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येईल. मांढरदेवीला जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येऊन कारवाई केली जाईल. (वार्ताहर) आरोग्य विभागाकडून आंबडखिंड घाटाखाली २४ तास आरोग्य पथक ठेवण्यात येणार आहे. दोन डॉक्टर व १० कर्मचारी, दोन रुग्णवाहिका १०८ नंबरच्या अ‍ॅम्बुलन्स २४ तास राहणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयात १० बेडची सोय करण्यात येणार आहे.  भोर व नसरापूर पोलिसांकडून चेक पोस्ट ठेवून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. येणाऱ्या वाहनांची पार्किंगची सोय करण्यात आली आहे. दोन पाण्याचे टँॅकर, एक पेट्रोलिंग वाहन घाटाच्या वर, खाली व मध्य भागी महसूल विभागाचे ६ जणांचे पथक ठेवण्यात येईल. यात मंडल अधिकारी, तलाटी, कोतवाल यांचा समावेश आहे. विनापरवाना खाद्यगृह, दारू, तत्सम पदार्थांची विक्री बंद करण्यात आली आहे. एक्साईज इन्सपेक्टर व उपप्रदेशिक परिवहन अधिकारी यांचे पथक कार्यरत राहणार आहे. भोर, एसटी स्टँड, रामबाग, चौपाटी, आंबडखिंड, आयटीआयजवळ पार्किंगची सोय करण्यात आली. तातपुरत्या स्वरूपात १० मुताऱ्यांची सोय करण्यात आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, मांढरदेवी यात्रेसाठी प्रशासन सज्ज झाले असल्याचे उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे व तहसीलदार वर्षा शिंगण यांनी सांगितले.