शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची आज पहिली विशेष गुणवत्ता यादी; प्रवेशासाठी २ दिवस

By admin | Updated: August 11, 2016 04:28 IST

अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी, ११ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी, ११ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. या फेरीसाठी दोन दिवसांत एकूण ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष यादीत नाव जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्रवार व शनिवारी संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. तर या फेरीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या विशेष फेरीत प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे.विशेष गुणवत्ता यादीत आवडते महाविद्यालय मिळाल्यावर विद्यार्थ्यांना आधी प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना आवडते महाविद्यालय मिळाले नाही, तर दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. १७ किंवा १८ आॅगस्ट रोजी दुसऱ्या विशेष गुणवत्ता यादीसाठी नव्याने लॉगीन आयडी आणि पासवर्ड देण्यास सुरुवात होईल, असे उपसंचालक कार्यालयाने सांगितले. पहिल्या विशेष फेरीसाठी सुमारे ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले आहेत. त्यांनाही १५० रुपये भरून नवा लॉगीन आयडी व पासवर्ड घेऊन अर्ज नोंदणी करावी लागेल, असे प्रशासनाने सांगितले.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अर्ज नोंदणीसाठी दिलेल्या दोन दिवसांत एकूण ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह पसंतीक्रम अर्ज दाखल केले आहेत. याउलट २६ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे. २७७ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरल्यानंतर तो कन्फर्म केला नाही, तर प्रवेश अर्ज कन्फर्म केल्यानंतर ३ हजार २२७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्जच भरला नाही. १६७ विद्यार्थ्यांनी अर्धवट पसंतीक्रम अर्ज भरला, तर ५०३ विद्यार्थ्यांनी तो कन्फर्म केला नाही. अशाप्रकारे एकूण ३१ हजार ०४० विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सामील होऊ शकले नाहीत. त्यांना आणखी दोन विशेष फेऱ्यांमध्ये प्रवेशाच्या संधी उपलब्ध आहेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)