शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांना मिळणार आज डिस्चार्ज

By admin | Updated: April 25, 2016 05:41 IST

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, सोमवारी सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, सोमवारी सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर दंतचिकित्सा बाह्यरुग्ण विभागात त्यांची तपासणी केली जाणार असून, दाताचे उपचार पूर्ण झाल्यावर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात येणार आहे, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे डॉ. रोहन सिक्वेरा यांनी सांगितले. १८ एप्रिलला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या भुजबळ यांना दातदुखी आणि छातीत दुखण्याचा त्रास होता. रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्यांचा रक्तदाब १८०-१२० इतका होता. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले, पण अजूनही दातांचे उपचार पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळेच सोमवारी सकाळी बाह्यरुग्ण विभागात भुजबळ यांच्या दातांचा एक्सरे काढला जाणार असून, पुढील उपचार करण्यात येणार आहेत, असे डॉ. सिक्वेरा यांनी सांगितले. भुजबळ यांचे सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी करण्यात आली होती. त्याचे अहवाल आले आहेत. भुजबळ यांच्या उजव्या मूत्रपिंडाचा आकार लहान झाला असून, प्रोस्टेटला त्रास आहे, पण या दोन्ही त्रासांसाठी त्यांच्यावर बाह्यरुग्ण विभागात उपचार होऊ शकतात. अन्य वैद्यकीय तपासणी अहवाल नॉर्मल आले आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळी भुजबळ यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉ. सिक्वेरा यांनी स्पष्ट केले. भुजबळ यांचा रक्तदाब आता नियंत्रणात आला असून, रक्तातील साखरही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे भुजबळ आता शारीरिकदृष्ट्या ‘फिट’ आहेत. भुजबळ यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती सामान्य होत आहे. आता त्यांना कोणताच त्रास नसल्याने, डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. सिक्वेरा यांनी सांगितले.