शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
5
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
6
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
7
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
8
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
9
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
10
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
11
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
12
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
13
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
14
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
15
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
16
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
17
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
18
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
19
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
20
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!

आज शहनाईचा बादशाह भारतरत्न बिस्मिल्ला खाँ यांची पुण्यतिथी

By admin | Updated: August 21, 2016 09:49 IST

आपल्याला बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईचा आवाज रोज न चुकता रेडिओच्या सर्व केंद्रांवरून मंगल प्रभातमध्ये ऐकायला येतो.

 - संजीव वेलणकर 

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २१ : आज शहनाईचा बादशाह भारतरत्न बिस्मिल्ला खाँ यांची पुण्यतिथीजन्म :- २१ मार्च १९१६ आपल्याला बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईचा आवाज रोज न चुकता रेडिओच्या सर्व केंद्रांवरून मंगल प्रभातमध्ये ऐकायला येतो. अजूनही मंगल कार्यात शहनाई वाजवणारे मिळाले नाहीत तर खानसाहेबांच्या वादनाची सीडी मिळवून वाजवली जाते. बज गई शहनाई, शादी अब होनेवाली है, असा संदेशा पोचविणा-या  शहनाईला बिसमिल्ला खाँ यांनी पारंपारिक शास्त्रीय संगीताच्या मैफलीच्या मखमली गालीचावर नेऊन बसविले. १९३६-३७ सालच्या सुमारास बनारस येथे स्टार हिंदुस्थानलेबलवर त्यांनी पहिली ध्वनिमुद्रण केली ती सगळी रागदारीची होती.

बिहाग, भैरवी, तोडी, दुर्गा, बागेश्री व जोनपुरी असे राग असून लेबलवर विलायतू बिस्मिल्ला ऑफ बनारस असं लिहिलं आहे. १९४१ मध्ये ग्रामोफोन कंपनीनं लखनौ येथे तीन ध्वनिमुद्रिका केल्या, त्यात तोडी व मालकंस राग तसेच ठुमरी व दादरा हे सुगम संगीताचे प्रकार आहेत. लेबलवर ह्यबिस्मिल्लाह अ‍ॅसण्ड पार्टी असं छापलं असून त्यावर सनई गत असं लिहिलं आहे. ध्वनिमुद्रिकाप्रेमींच्या घरातून व सार्वजनिक उत्सव समारंभातून त्या रेकॉर्ड्स वाजवल्या जाऊ लागल्या. गुरूंचा रोष पत्करूनही सुगम संगीताच्या तीन मिनिटं वाजणाऱ्या रेकॉर्ड्स ते देतच राहिले. त्यांची लोकप्रियता पाहून जून १९५१ च्या दिल्लीतल्या ध्वनिमुद्रण सत्रात बाबुल सिनेमातील दोन गाणी त्यांनी रेकॉर्ड केली- छोडम् बाबुलका घर व पंछी बनमे पिया पिया गाने लगा.

१९५७ पर्यंत रागदारी व सुगम संगीताच्या बरोबरीने जीवन ज्योती, आवारा, व बसंत बहार सिनेमातली गाणी त्यांनी वाजवली. १९५९ च्या प्रकाश पिक्चर्सच्या गूँज उठी शहनाई या बोलपटातल्या वादनानं तर खानसाहेबांना रसिकमनांत खास स्थान मिळवून दिलं. या बोलपटातील गाणी इतकी गाजली की ह्यदिलका खिलौना हाये टूट गया व जीवनमें पिया तेरा साथ रहे ही गाणी सनईवर वाजवून त्यांनी रेकॉर्डस केल्या. त्यात एकल वादन तर आहेच, पण उस्ताद अमीर खान साहेब यांच्या गायनाबरोबर जुगलबंदी व उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्या सतार वादनाबरोबरची जुगलबंदीही आहे. तसेच मा. व्ही.जी जोग जुगलबंदीही लोक अजून मेजवानी म्हणून ऐकतात.

यांच्या बरोबरची पुढच्या काळात सतार, बासरी, सरोद जुगलबंदीची ही जणू मेजवानी होती. हिंदी चित्रपटसृष्टीतही शहनाईला श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले. सनई हे भारतीय सुशिर वाद्य जगप्रसिद्ध करण्यात सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांची महत्त्वाची भूमिका आहे. २००१ साली बिस्मिल्ला खान यांना सर्वोच्च असा ह्यभारतरत्नह्ण पुरस्कार बहाल करण्यात आला. मा. बिस्मिल्ला खान यांचे २१ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे मा. बिस्मिल्ला खान यांना आदरांजली