शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवान गावडेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 23, 2016 03:57 IST

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग महादेव गावडे यांच्या पार्थिवावर सोमवारी

आंबोली (जि. सिंधुदुर्ग) : जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग महादेव गावडे यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या मूळ आंबोली-मुळवंदवाडी (ता. सावंतवाडी) येथेअंत्यस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश कदम यांनी दिली. त्यांच्या पश्चात वडील, आई, दोन भाऊ, पत्नी प्रांजल, दोन मुले प्रज्वल (वय ५) व वेदांत(वय ४ महिने ) असा परिवार आहे. जिल्हा प्रशासनाने जवान गावडे शहीद झाल्याची माहिती सकाळी नऊच्या सुमारास कुटुंबियांना दिली. ही बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. पांडुरंग हे २००१ मध्ये बेळगाव येथे मराठा लाईफ इन्फन्ट्रीमधून भारतीय सैन्यात भरती झाले होते. देशभर सेवा बजावताना त्यांनी विविध क्षेत्रात चमक दाखविली. ते चांगले फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉलपटू होते. तसेच त्यांना रेडिओ आॅपरेटर युनिटचे पारितोषिकही मिळाले होते. गेली दोन वर्षे ते ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. कुपवाडामध्ये अतिरेक्यांबरोबर सुमारे नऊ तास चाललेल्या चकमकीत जवानांनी घरात लपलेल्या पाचही अतिरेक्यांचा खातमा केला. मात्र अतिरेक्यांची गोळी वर्मी लागल्याने गावडे शहीद झाले. गावडे कुटुंबाला सैनिकी परंपरा आहे. पांडुरंग यांचे दोन्ही मोठे भाऊही सैन्यातच आहेत. त्यापैकी गणपत हे मोठे भाऊ निवृत्त सैनिक असून, मधला भाऊ अशोक धुळे येथे एनसीसीमधून सैन्यात कार्यरत आहेत. शहीद पांडुरंग फेबु्रवारीमध्ये एका महिन्याच्या रजेवर आले होते. यावेळी त्यांनी मोठ्या मुलाचा वाढदिवस, तर धाकट्या मुलाचा नामकरण सोहळा साजरा केला होता. हा त्यांच्या कुटुंबासाठी अखेरचा क्षण ठरला. (प्रतिनिधी)