शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा

By admin | Updated: February 5, 2016 02:14 IST

नितीन गडकरी, एकनाथ खडसे, इथिओपियाचे माजी राजदूत टिबोर पी. नाझ यांची प्रमुख उपस्थिती.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३0 वा दीक्षांत समारंभ शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता दीक्षांत सभागृहात होणार आहे. या दीक्षांत समारंभाला केंद्रीय रस्ते व जड वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथ खडसे यांच्यासह इथिओपियाचे माजी राजदूत टिबोर पी. नाझ (यूएसए), अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. यावर्षी २0६९ स्नातक उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी १३८७ स्नातक प्रत्यक्ष दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते पदवी ग्रहण करणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी यांनी गुरुवारी शेतकरी सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी व संलग्नित विविध अभ्यासक्रम, कृषी अभियांत्रिकी पदवी, स्नातकोतर पदवी व आचार्य (कृषी बीएसी, एमसीए कृषी बीटेक, एमटेक, कृषी पीएच.डी.) पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना दरवर्षी दीक्षांत समारंभात पदवी प्रदान केली जाते. यावर्षीही ५ फेब्रुवारीला कृषी विद्यापीठाचा ३0 वा दीक्षांत समारंभ होणार असून, समारंभात सर्वाधिक गुणांक प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा २७ सुवर्ण, १६ रौप्य पदके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. २९ रोख व तीन पुस्तक स्वरू पात बक्षिसे प्रदान करण्यात येतील. या पदवी समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यातील कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती एकनाथ खडसे असतील. दीक्षांत भाषण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करतील. यावेळी प्रथमच अमेरिकेचे मिस्टर टिबोर पी. नाझ यांचा शेती या विषयावर दांडगा अभ्यास असून, त्यांचे मार्गदर्शन कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे, तसेच ते शेतकर्‍यांनाही उद्बोधक ठरेल. या समारंभाला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे उपस्थित राहणार आहेत.