शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या वर्धापन दिनी आज स्नेहीजनांचा मेळा

By admin | Updated: December 28, 2015 01:25 IST

वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ वृत्तपत्राने पुण्यात १६ वर्षे पूर्ण करून १७ व्या वर्षात पदार्पण केले आहे़ हेच प्रेम वृद्धिंगत करण्याचे निमित्त

पुणे : वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ वृत्तपत्राने पुण्यात १६ वर्षे पूर्ण करून १७ व्या वर्षात पदार्पण केले आहे़ हेच प्रेम वृद्धिंगत करण्याचे निमित्त साधण्यासाठी सोमवारी (दि़ २८) सिंहगड रस्त्यावरील ‘लोकमत’ कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे़गेल्या १६ वर्षांत पुणेकरांच्या पाठबळावर ‘लोकमत’ची पुण्यात दमदार वाटचाल सुरू आहे. पुण्यात अनेक उपक्रमांचा श्रीगणेशा करीत ‘लोकमत’ने पुणेकरांच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्या. पुण्यच्या नागरी प्रश्नांवर ‘आता बास’, ‘कशासाठी पुण्यासाठी’ यासारख्या मोहीमांमधून वाचा फोडली. पुण्याच्या विकासासाठी उत्तरे शोधण्यासाठी ‘व्हिजन पुणे’, ‘बिल्डींग पुणे’ यासारखे उपक्रम राबविले. समाजातील सर्व घटकांना त्यामध्ये सहभाग घेता यावा यासाठी ‘मी पत्रकार’ हा अभिनव उपक्रम राबविला. अनेक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’चा गणपती हा उपक्रम तर महिला सन्मानाची चळवळ बनली आहे. वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ याचे भान ठेवून साहित्य, संस्कृती, कला अन् विद्येच्या या माहेरघरात या परंपरेला साजेशी भूमिका घेतल्यानेच पुणे शहरात ‘लोकमत’ रुजला आणि वाढला़ प्रगतीची गरुडभरारी घेत, ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट करीत, समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनाचा पाया मजबूत करीत ‘लोकमत’ ची दमदार वाटचाल सुरु आहे़ ऋणानुबंधाच्या या गाठी आणखी घट्ट करण्यासाठी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला वाचक, लेखक, विक्रेते, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी केले आहे़(प्रतिनिधी)