शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मांड परिसरात आज ‘लोकमत आपल्या दारी’

By admin | Updated: August 3, 2016 03:17 IST

ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून प्रभागातील नागरीकांच्या समस्या सुटल्या

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून प्रभागातील नागरीकांच्या समस्या सुटल्या किंवा कसे, याचा मागोवा घेण्यासाठी तसेच नगरसेवकांनी केलेल्या कामांचा उहापोह करण्याकरिता ‘लोकमत आपल्या दारी’या कार्यक्रमाचे उद्या बुधवार दि. ३ आॅगस्ट रोजी प्रभाग क्र. २ मध्ये आयोजन करण्यात आले आहे.पातलीपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, हिरानंदांनी इस्टेट, आयुक्त निवास, ब्रम्हांड, आझादनगरचा काही भाग आणि मानपाड्यातील शिवाजी नगर, असा मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. मतदार संख्येच्या निकषानुसार हा दुसऱ्या क्र मांकाचा प्रभाग आहे.विजेचा खेळखंडोबा ही या भागातील मुख्य समस्या आहेच, शिवाय शिवाजी नगरला दिली जाणारी सापत्न वागणूक यामुळे येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने आणि एकदा खंडीत झालेला वीज प्रवाह पूर्ववत होण्यास पाच ते सात तासांचा कालावधी लागत असल्याने लोक त्रस्त आहेत. येथील सार्वजनिक शौचालयांची अतिशय दुरवस्था झाली आहे. या प्रभागातील काही भागात नळाद्वारे अतिशय गढूळ पाणी येते.डोंगरीपाडा भागातील किंगकॉंग नगर भागात अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून या भागांना पालिकेने पाणी देण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील नागरीकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. ब्रम्हांडच्या नागरिकांना ठाणे परिवहनच्या अपुऱ्या बस सेवेचा त्रास सहन करावा लागत आहे. एक बस गेल्यावर अर्ध्या तासाहून अधिक वेळ येथे बस नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे.या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना आपल्या नगरसेवकाला, पालिका अधिकाऱ्यांना आणि इतर प्रशासनाला आपल्या कामांचा जाब विचारण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन लोकमतने केले आहे. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे, पालिकेचे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड आणि इतर राजकीय मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)