शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

आबासाहेब पटवारी यांचे आज ‘सहस्रचंद्रदर्शन’

By admin | Updated: August 27, 2016 04:09 IST

भाजपाच्या वर्तुळात खळबळ उडवून देणारे ज्येष्ठ नेते आबासाहेब पटवारी यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन शनिवारी होत आहे.

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीचे तिकीट दोन वेळा कापले गेल्याबद्दल दीर्घकाळ बाळगलेले मौन सोडल्याने डोंबिवलीतील संघ आणि भाजपाच्या वर्तुळात खळबळ उडवून देणारे ज्येष्ठ नेते आबासाहेब पटवारी यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन उद्या, शनिवारी होत आहे.भाजपाच्या शिस्तपालन समितीवर दीर्घकाळ काम केलेले आणि पक्षशिस्तीबद्दल अनेकांचे कान टोचणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या हस्ते आत्मचरित्राचे प्रकाशन होणार असल्याने ते नेमके कोणाचे कान टोचतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातही मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नववर्ष स्वागतयात्रेच्या आरंभापासून आबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिलेले लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक सदस्य अशोकराव कुकडे हेही या वेळी उपस्थित राहणार असल्याने संघ-भाजपा संबंधांबद्दल ते नेमके काय भाष्य करतात, याकडे परिवाराचे लक्ष लागले आहे.सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा पार पडेल. त्याला वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हेही उपस्थित असतील. वयाची ८० वर्षे पूर्ण करतानाच्या काळात भेटलेल्या व्यक्तींवर पटवारी यांनी आत्मचरित्रात प्रकाश टाकला आहे. नागरिकांमधून निवडून आलेला नगराध्यक्ष, अनेक पक्षांची मोट बांधून केलेले सत्ताकारण, त्या पदावर असताना झालेला तुरुंगवास, संघ-जनसंघ ते भाजपा असा राजकीय प्रवास हा त्यांच्या आत्मचरित्राचा गाभा आहे. त्याचबरोबर, राजकीय पदांपासून दूर ठेवल्यानंतरही पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रावर त्यांनी उमटवलेला ठसा, नववर्ष स्वागतयात्रेचे प्रवर्तक, अनेक सामाजिक उपक्रमांची सुरुवात यामुळे या सोहळ्यात नेमके कोणकोणते पदर उलगडले जातात, याविषयी उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)