शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

आज राष्ट्रपती वर्धेत

By admin | Updated: November 26, 2014 01:09 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येथील शिक्षा मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून बुधवार दि. २६ नोव्हेंबर रोजी वर्धेत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी वर्धा नगरी सज्ज झाली असून चोख पोलीस

बापूकुटीला भेट देणार : शिक्षा मंडळाच्या शताब्दी समारोहाला प्रमुख उपस्थिती वर्धा : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येथील शिक्षा मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून बुधवार दि. २६ नोव्हेंबर रोजी वर्धेत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी वर्धा नगरी सज्ज झाली असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास गोविंदराम सेकसरिया वाणिज्य महाविद्यालयाच्या पटांगणावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. तेथून मुख्य समारोहाला ते उपस्थित राहतील. यानंतर बजाजवाडीला भेट देतील. तेथे पंडित जवाहरलाल नेहरू व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वास्तव्य केलेल्या खोल्यांना भेट देऊन महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमात जातील. आश्रमात सायंकाळी होणाऱ्या प्रार्थनेत ते सहभागी होणार आहेत. दरम्यान, त्यांच्या हस्ते आश्रम परिसरात वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. शिवाय सेवाग्राम येथे तयार होणाऱ्या ‘गांधी फॉर टुमारो’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा ते घेणार आहेत. येथूनच सेवाग्राम येथे तयार केलेल्या विशेष हेलिपॅडवरून त्यांचे प्रस्थान होईल. त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमादरम्यान सेवाग्राम आश्रम अभ्यागतांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)