शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चोळेतील गावदेवीची यात्रा आजपासून

By admin | Updated: May 21, 2016 03:55 IST

ठाकुर्लीतील चोळे गावातील गावदेवीच्या यात्रेला शनिवार, २१ मेपासून प्रारंभ होत आहे.

डोंबिवली : ठाकुर्लीतील चोळे गावातील गावदेवीच्या यात्रेला शनिवार, २१ मेपासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा दोन दिवसांची असते. दर तीन वर्षांनी भरणाऱ्या या यात्रेची गावकरी आतुरतेने वाट पाहत असतात. उद्यापासून देवीचा जागर होणार आहे. त्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. कल्याण खाडीनजीक दुर्गाडीदेवीच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी मराठा आरमाराची स्थापना केली होती. तेव्हापासून ठाकुर्लीनजीक चोळेगावात यात्रेची ऐतिहासिक परंपरा असल्याचे सांगितले जाते. शिवशाहीनंतर पेशवाई आली. पेशवाईचा अस्त १८१८ साली झाला. त्यानंतर, ब्रिटिशांची राजवट आली. ब्रिटिश राजवटीत गव्हर्नर हॅन्री बॅटले यांनी चोळेगावचे शेतकरी सटवाजी पाटील यांना गावदेवीची-ग्रामदेवतेची सनद कायमस्वरूपी दिली. सटवाजी पाटील यांचा मुलगा भाऊ पाटील यांनी पुढे कारभार पाहिला. त्यानंतर, शेतकरी हरी बाळू पाटील व काथोड बाळू पाटील तसेच शंगर गोमा, कचरू राघो, दामा पदू चौधरी यांना ही जमीन इनामी दिली. सटवाजी पाटील यांची आठवी पिढी सध्या देवीची सेवा करीत आहे. सटवाजी पाटील यांचे वंशज मधुकर पाटील हे आता देवीच्या संस्थानाचे काम पाहत आहे. मुकुंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. ग्रामस्थांनी दिलेल्या देणगीतून ३ मे २००२ रोजी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. देवीची यात्रा दरवर्षी वैशाख पौर्णिमेला लागून येणाऱ्या सोमवार व मंगळवारी भरायची. त्यानंतर, यात्रा तीन वर्षांनी भरवण्याचा नियम केला गेला. आता दर तीन वर्षांनी वैशाख पौर्णिमेला दोन दिवसांची यात्रा भरते. चोळे, बारका चोळा, आताचा नवापाडा आणि खंबाळपाडा हा चोळेगावचा एक पाडा अशा तीन गावांची ही जत्रा असते. या गावच्या सासरी गेलेल्या लेकी यानिमित्त माहेरी येतात. उत्सवाला हजेरी लावतात. मधुकर पाटील यांची मुलगी अपर्णा ही तर अमेरिकेतून खास यात्रेसाठी येणार आहे. (प्रतिनिधी)