शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

आज मुंडे नाहीत, हे नशीबच!

By admin | Updated: February 11, 2017 01:51 IST

हा काळ १९९१-९२ चा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारणातील गुन्हेगारांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. विरारमधील हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचा पप्पू कलानी

हा काळ १९९१-९२ चा. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजकारणातील गुन्हेगारांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. विरारमधील हितेंद्र ठाकूर आणि उल्हासनगरचा पप्पू कलानी हे स्वपक्षातील आमदार हे मुख्यत: त्यांच लक्ष्य होतं. त्यांचे साम्राज्य, दहशत संपवण्याचा सुधाकरराव नाईकांनी चंगच बांधला होता. आपल्या या आमदारांना सांभाळून घ्या, हा संरक्षणमंत्री शरद पवारांचा सल्लाही म्हणे सुधाकररावांनी जुमानला नाही. पप्पू कलानीला अटक झाली, तेव्हा त्याला मारहाण करू नका, असे म्हणे पवारांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. एकाच वर्षात सुधाकररावांचे मुख्यमंत्रीपद गेलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. ते येताच भाजपाच्या गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर हल्लाबोल केला. पवारांचे कलानी, ठाकूर तसंच अन्य गुन्हेगारांशी संबंध असल्याचे आरोप त्यांनी केले. ठाकूर व कलानी यांचे म्हणे दाउदशीही संबंध होते. त्यामुळे पवारांचाही दाउदशी संबंध जोडण्यात आला. त्याच काळात बाबरी मशिदीवरून झालेल्या दंगली आणि बॉम्बस्फोट यांच्याशी दाउदचा संबंध असल्यानं पवारांची खूपच बदनामी झाली. इतकी की १९९५ च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा राज्यात पहिल्यांदाच पराभव झाला. युती सत्तेवर आली. तेव्हापासून पप्पू व हितेंद्र यांचे दाउदशी संबंध असल्याचे आरोप सतत होतच आले. पप्पू खुनाबद्दल तुरुंगात आहे. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, फसवणूक, बेकायदा दारूनिर्मिती असे असंख्य आरोप आहेत. त्याची पत्नी ज्योती सध्या राष्ट्रवादीची आमदार आहे. ती उल्हासनगरची नगराध्यक्षही होती. तिच्यावरही गुन्हे आहेत. मुलगा ओमी याच्याविरोधातही गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाची तक्रार केली होती.पण उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सारंच चित्र पालटलं. दोघाही भाजपा कार्यकर्त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली ओमीविरुद्धची तक्रार मागे घेतली. मग लागलीच ओमीच्या संघटनेशी भाजपाने आघाडी केली. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणाऱ्या कलानींशी हा भाजपाचा घरोबा. त्यामुळे पप्पू आणि ओमी कलानी गंगेत न्हाल्यासारखे पवित्र झाले आणि नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, दानवे यांच्यासोबतच बॅनर्सवर ओमी आणि पप्पू कलानी यांचीही छायाचित्रं झळकत आहेत. भाजपाचा सारा कारभार अगदी पारदर्शक! दुसरीकडे उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या प्रचाराचे जे बॅनर्स लागले आहेत, त्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासमेवत ज्योती कलानी यांची मोठी छायाचित्रं आहेत. पवारांवर आधीच शिक्का पडला आहे. त्यामुळे त्याचं काही वाटत नाही.पण भाजपाचं काय? आम्ही सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुरुंगात जातील, असे फडणवीस निवडणुकांआधी सांगत होते. पण ते तर चालले आहेत भाजपामध्ये. कलानी कुटुंब हे त्यापैकी एक. राज्यात अशा अनेकांना भाजपाने पवित्र करून घेतलं आहे. हे सारं पाहायला गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत, हे नशीबच. - संजीव साबडे