शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

आज अर्थ अवर

By admin | Updated: March 25, 2017 01:47 IST

पर्यावरणाच्या संवर्धनासह वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन ‘अर्थ अवर’चा प्रयोग जगभर राबवण्यात येत आहे.

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासह वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण हे प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन ‘अर्थ अवर’चा प्रयोग जगभर राबवण्यात येत आहे. २००८ सालापासून राबवण्यात येत असलेल्या या प्रयोगाला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. देशातील दिल्ली आणि मुंबईसारखी प्रमुख शहरे ‘अर्थ अवर’मध्ये प्राधान्याने सहभागी होत आहेत. मात्र मागील दोनएक वर्षांपासून यात औपचारिकता येत आहे. ही औपचारिकता येऊ नये म्हणून आणि नागरिकांचा या चळवळीतला प्रत्यक्ष सहभाग आणखी वाढावा म्हणून तरुणाईने मुंबईकरांना ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने शनिवारी (२५ मार्च) रात्री ८.३० ते ९.३० या वेळी दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड व सिडने मॉर्निंग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ साली आॅस्ट्रेलियामधील सिडनी येथे हवामान बदल (क्लायमेट चेंज) विषयावर जनजागृती अभियानाच्या निमित्ताने पहिला ‘अर्थ अवर’ साजरा करण्यात आला. ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत एक तास दिवे बंद ठेवण्यात आले. पहिल्याच प्रयोगात सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता सहभागी झाली. शिवाय उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठांनीही या चळवळीत सहभाग घेतला. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. पहिल्याच प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद पाहता २००८ साली जगभर हा प्रयोग राबवण्यात आला. (प्रतिनिधी)च्न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथील कोका-कोला बिलबोर्ड, गोल्डन गेट ब्रिज सॅन फ्रॅन्सीस्को, स्पेस नीडल सीएटल, सिडनी आॅपेरा हाउस, रोममधील कलोसीयम असे नेहमीच प्रकाशित असणाऱ्या स्थळातील दिवे विझवण्यात आले होते.च्२००८ साली या मोहिमेत ५० दशलक्ष लोकांचा सहभाग होता. २००८ साली या प्रकल्पात सहभागी गुगलने त्या दिवशी आपले वेबपेज काळ्या रंगात ठेवले होते.च्जगभर ‘अर्थ अवर’ साजरा होत असतानाच देशातील दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांनीही यात प्रत्यक्षरीत्या सहभाग नोंदवला.च्‘अर्थ अवर’च्या निमित्ताने एक तास वीज बंद हा काही ठोस उपाय नाही. मात्र यानिमित्ताने का होईना नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटू लागले आहे. हा प्रतीकात्मक प्रयोग असला तरीदेखील नागरिक याला उत्तम प्रतिसाद देत आहेत.च्मात्र गेल्या दोनएक वर्षांपासून यात औपचारिकता येत आहे. परिणामी ही औपचारिकता येऊ नये म्हणून छोटेखनी पुढाकारासाठी का होईना प्रत्येकाने यात योगदान देणे क्रमप्राप्त आहे.च्‘अर्थ अवर’च्या निमित्ताने नागरिक पर्यावरणाविषयी जागरूक आहेत आणि संघटित होत आहेत. हे दिलासादायक असल्याने नक्कीच पर्यावरण संवर्धनासाठी हे छोटे कामदेखील मोठेच आहे.