शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

आज ‘महाराष्ट्र बंद’

By admin | Updated: June 5, 2017 06:12 IST

संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि.५) राज्यव्यापी बंदची हाक दिली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नाशिक/ अहमदनगर : संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि.५) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. उद्या राज्यभरातील शेतकरी बैलगाड्या, जनावरे आणि संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरणार आहेत. नाशिक येथे रविवारी झालेल्या किसान क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. तसेच संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. बैठकीला ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, डॉ. अजित नवले, राजू देसले, चंद्रकांत बनकर, डॉ. गिरीधर पाटील, हंसराज वडघुले यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. पुणतांबा गावातील ग्रामस्थांनीदेखील एकत्र येऊन संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे़ कोअर कमिटीला बाजूला ठेवून संपाची सूत्रे नामदेव धनवटे, डॉ़ धनंजय धनवटे, बाळासाहेब चहाण, विजय धनवटे यांनी हाती घेतली आहेत़ कुणा एका व्यक्तीकडे संपाचे नेतृत्व न सोपविता गावासह जिल्ह्यातील इतर शेतकरी एकत्रित संपाची दिशा ठरवतील, असा निर्णय रविवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला़उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना (रघुनाथदादा) सिटू, किसान सभा, छावा आदी पक्ष व संघटना सहभागी होणार आहेत. सातवा वेतन आयोग देताना सर्वांना दिला दिला जातो. त्यात शिपाई, लिपिक, अधिकारी असा भेदाभेद केला जात नाही, मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असा भेदाभेद का? शेतकरी जितका मोठा तितका त्यांच्यावर कर्जाचा डोंगर मोठा आहे. काही भागांत अधिक जमीन असणारे शेतकरी नापिकीमुळे कर्जबाजारी आहेत. तर काहींचे खाते विलगीकरण झालेले नाही. अशा शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती का नको. त्यामुळे अल्पभूधारक, भूधारक असा भेद न करता सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती हीच शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत संप मागे घेतला जाणार नाही, असे ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी सांगितले.>आठवडे बाजार उठविलेसंपाच्या चौथ्या दिवशीही राज्यात अनेक ठिकाणी बाजार बंद ठेवण्यात आले. शहरांकडे जाणारे दूध व भाजीपाल्याची वाहने अडविण्यात आली. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात रविवारी भरणारे सर्व आठवडेबाजार उठवले गेले. इंदापूर तालुक्यातील पाच गावांमधील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावर दूध, फळे, कांदे फेकत संताप व्यक्त केला. >बंदला शिवसेनेचा पाठिंबाशेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी सोमवारी, ५ जून रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा असून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशी माहिती शिवसेना सचिव आणि प्रवक्ते खासदार विनायक राऊतयांनी दिली. - वृत्त/१३पुरोगामी संघटना ठामशेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला डाव्या व पुरोगामी चळवळीतील संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास, गोदी व बंदर कामगार सक्रियपणे संपात सामील होतील, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते एस.के. शेट्ये यांनी दिला. दुधावर बहिष्कार टाका!राज्यातील शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी सरकार जर गुजरातमधून दूध मागवणार असेल, तर हे दूध नाकारून मुंबईकरांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष शरद कदम यांनी केले आहे.शेतकरी पुत्रांच्या हाती संपाचे नेतृत्व कर्जमुक्ती व शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य होऊन शेतकरी जिंकल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही. - डॉ. अजित नवले, शेतकरी किसान सभा.