शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आज ‘लोकमत वॉटर समिट २०१७’

By admin | Updated: July 11, 2017 06:17 IST

लोकमत समूहा’तर्फे मंगळवार, ११ जुलै रोजी ‘लोकमत वॉटर समिट २०१७’चे आयोजन करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत ‘लोकमत समूहा’तर्फे मंगळवार, ११ जुलै रोजी ‘लोकमत वॉटर समिट २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन होणार आहे.अंधेरी पूर्वेकडील ‘आयटीसी मराठा’ येथे दुपारी १२.३० वाजता ‘वॉटर समिट’ला प्रारंभ होणार आहे. दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान समिटसाठी नोंदणी होईल. दुपारी १.३० वाजता समिटचे उद्घाटन होईल. जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर हे या समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. ‘तरुण भारत संघा’चे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, राज्याचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची प्रमुख उपस्थिती असेल. ‘लोकमत’ मीडियाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हे उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन करतील. ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मेहता हे देखील या सत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करतील. उद्घाटन सत्रानंतर राज्यभर जलसंधारणासाठी कार्यरत असलेल्या दिग्गजांचा गौरव होईल. त्यानंतरच्या सत्रात गिरीष महाजन, राम शिंदे, बबनराव लोणीकर यांना ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर बोलते करतील.सत्र पहिले : ‘जलसंधारणातील सध्याची आव्हाने आणि शासनाचे प्रयत्न’ या विषयावरील चर्चेत राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ‘ड्रॉप डेड फाऊंडेशन’चे संस्थापक आबिद सुरती, ‘महिंद्रा ग्रुप’चे चीफ सस्टेनेबिलिटी आॅफिसर अनिरबन घोष, ‘गोवर्धन इको व्हिलेज’चे चीफ सस्टेनेबिलिटी आॅफिसर निमाई लीला दास आणि ‘युनिसेफ इंडिया’चे वॉश स्पेशलिस्ट युसूफ कबीर आदी मान्यवर सहभागी होतील. या सत्राचे सूत्रसंचालन ‘द ंिहंदू’ वृत्तपत्राचे निवासी संपादक सचिन कालबाग हे करतील.सत्र दुसरे : ‘स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी : निरोगी जनतेसाठी आवश्यक’ या विषयावरील चर्चेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे संचालक डॉ. सतीश उम्रीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार, ‘सिडको’चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि ‘टेरी’चे सल्लागार जी.एस. गिल, ‘वॉटर फॉर पीपल’चे संचालक मीना नरुला आदी मान्यवर सहभागी होतील. या सत्राचे सूत्रसंचालन ‘सेफ्टी वॉटर उपक्रमा’च्या उपाध्यक्ष पूनम सेवक या करतील.सत्र तिसरे : ‘पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी व्यावहारिक उपाय’ या विषयावरील चर्चासत्रात राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ ढवळे, ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष अमला रुईया, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या विकास विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. आर.सी. बिंदल, ‘अंबुजा सिमेंट’च्या सीएसआरचे अध्यक्ष पिरल तिवारी, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आदी मान्यवरांचा सहभाग असेल.>मान्यवरांची उपस्थितीजलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन होणार आहे. जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर हे या समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.उद्घाटन सत्रानंतर जलसंधारणासाठी कार्यरत असलेल्या राज्यातील दिग्गजांचा गौरव होईल.