शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ‘जलमित्र अभियान’

By admin | Updated: May 8, 2016 07:39 IST

सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता वर्तमान आणि भविष्यासाठी पाण्याचा थेंब अन थेंब वाचविणे गरजेचे असून, यासंदर्भात ‘लोकमत’चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत

‘लोकमत’चा जलसाक्षरतेसाठी पुढाकार : राज्यभर राबविणार मोहीममुंबई : सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता वर्तमान आणि भविष्यासाठी पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणे गरजेचे असून, यासंदर्भात ‘लोकमत’चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानास रविवार दि. ८ मेपासून प्रारंभ होत आहे. सहा आठवड्यांच्या या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, विद्यार्थी आणि सेलिब्रिटीज सहभागी होणार आहेत.महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि देशातील ४० टक्के प्रदेशावर सध्या जलसंकट ओढावले आहे. या स्थितीत पाण्याची बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे; पण समाजात आजवर यासंदर्भात नेमकेपणाने जागरुकता निर्माण केली गेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलसाक्षरतेसाठी जलमित्र अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. सहा आठवड्यांच्या या अभियानात पहिल्या सप्ताहामध्ये ‘लोकमत’ च्या अंकात पाण्याचे महत्त्व आणि जलसाक्षरतेबाबत जनजागरण करणाऱ्या जाहिराती प्रसिद्धी करण्यात येणार आहेत. ‘लोकमत डॉट कॉम’ आणि सोशल मीडिया विशेषत: फेसबुक, टिष्ट्वटरवरून जलबचतीसाठी जागृती करण्यात येईल. (प्रतिनिधी)विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी चर्चा ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाच्या आयोजनासंदर्भात ‘लोकमत’चे संपादकीय मंडळ आणि व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी समाजातील विविध स्तरातील लोकांशी तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी चर्चा केली. या साऱ्यांनी या अभियानाचे स्वागत केले. अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यभरात एकूणच या जलमित्र अभियानाबद्दल उत्सुकता दिसून आली.सेलीब्रिटीजसह अभियान राबविणारहॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि मेसमध्ये (खानावळ) ‘ग्लास आॅफ वॉटर आॅन ग्राऊंड’ ही मोहीम राबविण्यात येईल. याशिवाय रुग्णालये, माहिती - तंत्रज्ञान कंपन्या, उत्पादन करणाऱ्या कंपन्या, मल्टिप्लेक्स् आणि मॉल्समध्येही जलमित्र अभियान राबविण्यात येणार आहे.दुसऱ्या आठवड्यात वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर पोस्टर्स /स्लोगन्स् स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. तिसऱ्या आठवड्यात सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग स्पर्धा घेण्यात येईल. चौथ्या आणि पाचव्या आठवड्यात देशातील सेलिब्रिटीज् या जलमित्र अभियानात सहभागी होतील. सेलिब्रिटीजसह ‘मी जलमित्र’अभियान राबविण्यात येईल़ जलसाक्षरतेसंदर्भात स्वाक्षरी मोहीम घेऊन जनतेच्या स्वाक्षरींची जंत्री मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. याशिवाय जनजागरणासाठी बॅचेस, मग, पाण्याच्या बाटल्या, टोप्या, टी - शर्टस् वाटण्यात येतील तसेच सोसायट्यांमध्ये स्टॅन्डीज् आणि पोस्टर्स लावण्यात येतील. ‘लोकमत’च्या माध्यमातून या मोहिमेचे फलित अखेरच्या सप्ताहात जाहीर करण्यात येणार आहे.