मुंबई : दलाल नव्हे तर आरटीओ प्रतिनिधी म्हणून अधिकृत परवान्याची मागणी करणा-या आरटीओ दलालांनी बुधवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या या मोर्चाकडे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी मात्र साफ दुर्लक्ष केले. संतापलेल्या दलालांनी गुरुवारपासून राज्यातील प्रत्येक आरटीओबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.मोर्चाचे आयोजन केलेल्या महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघटना कृती समितीने मोर्चाचे आयोजन केले होते. समितीचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी निवेदन घेऊन कृतीसमितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात गेले होते. मात्र मुख्यमंत्रीच काय, तर परिवहन मंत्र्यांचीही भेट मिळाली नाही. परिणामी शिष्टमंडळाला परिवहन खात्याच्या प्रधान सचिवांच्या भेटीवर समाधान मानावे लागले. आंदोलनाची पूर्वकल्पना असतानाही आंदोलनकर्त्यांना अशी सावत्र वागणूक दिल्याने शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. शिंदे म्हणाले, शासनाच्या याच सापत्न वागणुकीमुळे गुरुवारपासून राज्यातील प्रत्येक आरटीओबाहेर उपोषण, धरणे आणि सह्यांची मोहीम राबवण्यात येईल.
आजपासून आरटीओबाहेर उग्र आंदोलन
By admin | Updated: February 12, 2015 05:30 IST