शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आज प्रचाराचा धुरळा उडणार!

By admin | Updated: February 19, 2017 03:46 IST

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक राहिले असून, रविवारी सायंकाळी ५ वाजेनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे रविवारी

- चेतन ननावरे,  मुंबई

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक राहिले असून, रविवारी सायंकाळी ५ वाजेनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार असून, रात्रीपासून छुप्या प्रचाराला सुरुवात होईल.महापालिका निवडणुकीत प्रथमच सर्व प्रस्थापित पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे बहुतेक प्रभागांत तिरंगी किंवा चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. त्यात प्रचाराचा शेवटचा दिवस रविवार असल्याने उमेदवारांनी प्रचाराच्या विविध क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत. बहुतेक मतदार घरीच असल्याने त्यांना गाठण्यासाठी उमेदवारांनी गटाध्यक्ष आणि इमारतप्रमुखांचे गट तयार केले आहेत. स्वत: धावती भेट देण्यासाठी काही उमेदवारांनी प्रभागात बाइक रॅलीचे आयोजन केले आहे. शेवटचा प्रहार वाया जाऊ नये, म्हणून रविवारच्या दुपारी आराम न करता कार्यकर्त्यांना पक्षाच्या निवडणूक कार्यालयात जातीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सायंकाळी ५ वाजल्यानंतर अधिकृतरीत्या प्रचारास पूर्णविराम द्यावा लागणार आहे. मात्र याच मोक्याच्या क्षणी मतदारांना आपल्याकडे वळवण्याची व्यूहरचना राजकीय पक्षांनी आखली आहे. मद्यापासून रोकड वाटण्याच्या कामाला याचवेळी सुरुवात होणार आहे. बहुतेक पक्ष कार्यालयांनी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दीपोत्सव आणि विविध धार्मिक मंडळांची यादी तयार केली आहे. याशिवाय सोसायटी आणि वसाहतींमधील कमिट्यांनाही संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यात उमेदवारांच्या खास माणसांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. मंडळ, संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी संबंधित व्यक्तींना संपर्क साधून आपापला मोबदला मिळवणार असल्याची माहिती आहे.घरोघरी प्रचार सुरूच राहणार!राजकीय पक्षांमधील इमारतप्रमुख आणि गटप्रमुखांना घरोघरी छुपा प्रचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सायंकाळनंतर गळ्यात झेंडा नसला, तरी आपल्या निवडणूक चिन्हाबाबत मतदारांना वारंवार आठवण करून देण्यास कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे उघडपणे नव्हे, तर छुप्या पद्धतीने घरोघरी प्रचार सुरू राहणार आहे.गाडीतून ठेवणार देखरेख!उघडपणे प्रचारास बंदी असल्याने काही उमेदवारांकडून सायंकाळी गाडीतूनच प्रचार करण्यात येईल. प्रभागात वारंवार चक्कर मारताना मतदारांसोबत संपर्कात राहण्याचे आवाहन उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी करताना दिसतील. याशिवाय मोठ्या लोकसंख्येच्या रहिवासी वसाहतींमध्ये छुप्या बैठका होण्याची शक्यता आहे.सोशल मीडियाचे काय?उघड प्रचार करता येणार नसल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. विशेषत: सोशल मीडियाच्या माध्यमातूनच अफवांनाही पेव फुटते. त्यामुळे पोलिसांसह निवडणूक आयोग सोशल मीडियावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवणार, हे दोन दिवसांत स्पष्ट होईल.निवडणूक आयोगासमोर आव्हान!मद्य आणि रोकडवाटप करणाऱ्यांवर देखरेख ठेवतानाच अशा प्रकारांना आळा घालण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर असेल. दरम्यान, छुप्या प्रचारावर करडी नजर ठेवताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खबरदारीही आयोगाला घ्यावी लागणार आहे.