शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटी आता डोंबिवलीपर्यंत

By admin | Updated: March 2, 2017 03:45 IST

ठाणेकरांना आता बऱ्यापैकी चांगली सेवा दिल्यानंतर ठाणे परिवहन सेवेने बुधवारपासून डोंबिवलीपर्यंत मजल मारली

ठाणे : ठाणेकरांना आता बऱ्यापैकी चांगली सेवा दिल्यानंतर ठाणे परिवहन सेवेने बुधवारपासून डोंबिवलीपर्यंत मजल मारली आहे. त्यानुसार, चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली पश्चिम अशी बससेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे चेंदणी कोळीवाडा बसस्थानकापासून खिडकाळी आणि पुढे डोंबिवलीपर्यंत जाण्यासाठी नवी मुंबई परिवहन सेवेवर अवलंबून राहणाऱ्या प्रवाशांसाठी आता टीएमटी हा उत्तम पर्याय तयार झाला आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन हा मार्ग फायद्याचा ठरण्याची शक्यता असून डोंबिवलीला लोकलच्या गर्दीमधून प्रवास करणाऱ्यांसाठीदेखील ही सेवा चांगला पर्याय ठरणार आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सर्वच महापालिकांच्या परिवहन सेवांनी शिरकाव केला असून अनेक मार्गांवर त्या सुरू असल्याने टीएमटीला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. टीएमटी चांगली प्रवासी सेवा देऊ शकत नसल्याने इतर परिवहन सेवांवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागते. या स्पर्धेत उतरण्यासाठी टीएमटीने एक पाऊल पुढे टाकले असून जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने येणाऱ्या बसेसमुळे काही प्रमाणात प्रवासी सेवेमध्ये सुधारणा होत आहे. चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली या मार्गावर आतापर्यंत नवी मुंबईची बससेवाच सुरू होती. मात्र, या मार्गावर आता टीएमटीची बससेवादेखील बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यानुसार, चेंदणी कोळीवाडा येथून पहिली बस सकाळी ६.३५ वाजता सुटणार असून शेवटची बस रात्री ९ वाजता असणार आहे. तर, डोंबिवलीतून पहिली बस सकाळी ८.३५ वाजता आणि शेवटची बस रात्री १०.४० वाजता सुटेल. (प्रतिनिधी) >असा आहे बसचा मार्ग चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली (पश्चिम) या मार्गावर ही बससेवा सुरू केली. ती खारेगाव आणि मुंब्रामार्गे न जात थेट ऐरोलीमार्गे डोंबिवलीला जाणार आहे. आंग्रे चौक, कळवानाका, विटावा, ऐरोलीनाका, माइंड स्पेस, रबाळे पोलीस स्टेशन, गोल्डन गॅरेज, महापे सर्कल, शीळफाटा, कल्याणफाटा, पडलेगाव, खिडकाळी, लोढा हेवन (पलावा), काटईगाव, वैभवनगरी, मानपाडा, शनी मंदिर, सिंघवी गार्डन, सोनारपाडा, चाररस्ता चौक, शिवाजी चौक, डोंबिवली पूर्व, नानानानी पार्क, शास्त्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली पश्चिम असा मार्ग असणार आहे.