शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटीची अनास्था व्होल्वोला भोवणार

By admin | Updated: September 20, 2016 03:49 IST

सर्व्हिस आणि आॅइलिंग होत नसल्याची बाब सोमवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत उघड झाली.

ठाणे : परिवहन सेवेतील वातानुकूलित व्होल्वो बसचे वेळेत सर्व्हिस आणि आॅइलिंग होत नसल्याची बाब सोमवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत उघड झाली. त्यामुळे टीमएमटीला एकमेव सर्वात जास्त उत्पन्न देणारी ही बसही प्रशासनाच्या अनास्थेमुळे भंगारात काढण्याचा प्रताप केला जात असल्याचा आरोप परिवहन समिती सदस्यांनी केला. टीएमटीच्या बैठकीत क्लचप्लेट बसवण्याचा मुद्दा चर्चेसाठी आला होता. त्या अनुषंगाने सदस्य तकी चैऊलकर यांनी एक क्लचप्लेट किती किमी धावणे अपेक्षित असते, असा सवाल केला. त्यावर, केवळ १५ ते २० हजार किमी एक क्लचप्लेट धावते, असे प्रशासनाने उत्तर दिले. परंतु, खाजगी बसेस जर ८० हजार किमी धावतात, तर आपल्याच बस का कमी धावतात, असा सवालही करून त्यांनी प्रशासनाला अडचणीत आणले. परंतु, आपल्या बसवर लोड अधिक असल्याने किमीमध्ये फरक पडत असल्याचे प्रशासनाने सांगितले. दुसरीकडे याच मुद्याच्या अनुषंगाने हेमंत धनावडे यांनी थेट व्होल्वो बसच्या मुद्याला हात घातला. परिवहनमध्ये किती व्होल्वो बस आहेत, या बसचे किती किमी अंतर कापल्यावर सर्व्हिस होणे अपेक्षित आहे. त्यानुसार, परिवहनमध्ये ३० व्होल्वो बस असून त्यातील १५ बसची नियमित सर्व्हिस झाल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. परंतु, नव्याने दाखल झालेल्या ६ बसची एकदाही सर्व्हिस अथवा आॅइलिंगही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात एका बसची ३० हजार किमी, नंतर सर्व्हिस आणि ८० हजार किमी नंतर आॅइलिंग होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे वेळेत या प्रक्रिया झाल्या नाही, तर कंपनीदेखील या बसची वॉरंटी देत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून धनावडे यांनी पुन्हा प्रशासनाला अडचणीत आणले.व्होल्वो बस या घोडबंदर भागातील मुल्लाबाग येथे उभ्या केल्या जातात. परंतु, येथे एखाद्या बसच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी वागळे डेपोला जावे लागत असल्याची बाबही समोर आली आहे. आता येथे हवा भरण्याचे मशीन बसवले जाईल, असे आश्वासन परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिले. >बसमधील बदलामुळे परिवहनला फटकाठाणे : आधीच डबघाईला आलेल्या ठाणे परिवहन सेवेला आता आणखी एक फटका बसणार आहे. नव्या शासनाने पूर्वीच्या जेएनएनयूआरएमच्या बसच्या मॉडेलमध्ये बदल करून त्या खरेदी करण्याचा अट्टहास केला असून या १९० बसच्या खरेदीत आता साडेतीन कोटींचा भुर्दंड परिवहनला सहन करावा लागणार आहे. त्यानुसार, या वाढीव खर्चास मंजुरी मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या महासभेत पटलावर ठेवला आहे.ठाणे परिवहनच्या ताफ्यात यापूर्वी जेएनएनयूआरएमअंतर्गत २०० बस दाखल झाल्या होत्या. त्यांची उंची व्यवस्थित असल्याने त्यांचा तळ रस्त्याला लागत नव्हता. परंतु, आता घेण्यात येत असलेल्या बसचा तळ रस्त्याला लागण्याची शक्यता अधिक असल्याचे यापूर्वीच एका घटनेतून समोर आले आहे. लो फ्लोअर बसचे ग्राउंड क्लीअरन्स फक्त ४०० मिमी आहे. त्यामुळे बस स्पीड ब्रेकरवरून गेल्यास तिचा तळ खाली लागत आहे. असे असतानादेखील याच बस घेण्याचा अट्टहास नव्या सरकारने केला आहे. याचा फटका आता परिवहन सेवेसह प्रवाशांनादेखील सहन करावा लागणार आहे. या बसचा तातडीने पुरवठा करण्यासाठी मूळ आदेशात बदल करण्याचे परिवहनने ठरवले आहे. त्यानुसार, लो फ्लोअर ग्राउंड क्लीअरन्स ४०० मिमीच्या ९० बस खरेदी करण्याकरिता मूळ किमतीवर प्रतिबस रक्कम ३०,८०० नुसार वाढीव दराने एकूण २ कोटी ७७ लाख २० हजार इतका खर्च वाढणार आहे. तर, ९०० मिमी फ्लोअर हाइटच्या ३० बस खरेदी करण्याकरिता मूळ किमतीवर प्रतिबस २ लाख यानुसार वाढीव दराने एकूण ६० लाख इतका खर्च वाढणार आहे. (प्रतिनिधी)>नव्या सरकारने हेच मॉडेल खरेदी करण्याचा अट्टहास केल्याचा आरोप परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी केला आहे. त्याचा बोजा आम्ही का सहन करायचा आणि त्यातही या बसचा तळ रस्त्याला लागत असल्याने भविष्यात त्या बंद होण्याचे प्रमाण वाढल्यास याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला. असे असूनही हा प्रस्ताव उद्याच्या महासभेत पटलावर येणार आहे.>नव्याने दाखल ६ बसपैकी एकाचेही सर्व्हिसिंग नाहीपरिवहनमध्ये ३० व्होल्वो बस असून त्यातील १५ बसची नियमित सर्व्हिस झाल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. परंतु, नव्याने दाखल झालेल्या ६ बसची एकदाही सर्व्हिस अथवा आॅइलिंगही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात एका बसची ३० हजार किमी, नंतर सर्व्हिस आणि ८० हजार किमी नंतर आॅइलिंग होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे वेळेत या प्रक्रिया झाल्या नाही, तर कंपनीदेखील या बसची वॉरंटी देत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून धनावडे यांनी पुन्हा प्रशासनाला अडचणीत आणले. टीएमटी प्रशासनाच्या या अनास्थेमुळेच या बसेस आता भंगारात काढण्याची नामुष्की ओढवली आहे.