शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

पाणीसाठ्यात २४ तासांत एक टीएमसीने वाढ

By admin | Updated: August 3, 2016 00:36 IST

खडकवासला धरणसाखळीमध्ये गेल्या २४ तासांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.

पुणे : खडकवासला धरणसाखळीमध्ये गेल्या २४ तासांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे एका रात्रीत तब्बल एक टीएमसी पाणीसाठ्याची वाढ झाली असून, पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणाचा पाणीसाठा साडेअठरा टीएमसीवर पोहोचला आहे.दरम्यान, गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक ८८ मिमी पावसाची नोंद टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर पानशेत धरण ७३ टक्के भरले असून, वरसगाव धरण ६0 टक्के, तर टेमघर धरण ४९ टक्के भरले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून या चारही धरणांमध्ये पावसाने दमदार पुनरागमन केलेले आहे. पावसाचा हा जोर वाढत असल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ होत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. तर सायंकाळी पाचनंतर या चारही धरणांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने हा पाणीसाठा आणखी एक टीएमसीने वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना तसेच सिंचनासाठी कालव्याद्वारे ११५५ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असून, पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यास हा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच वरसगाव आणि पानशेत ही प्रमुख धरणे वेगाने भरत असल्याने पुढील वर्षी पाणीकपातीचा सामना करावा लागणारा असल्याचेही सांगण्यात आले. >गेल्या २४ तासांतील पाणीसाठाधरणाचे नावपाणीसाठा खडकवासला१.२९पानशेत७.८९वरसगाव७.६२टेमघर१.८0एकूण१८.५0