शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती पूजेसाठीचा लढा दोन वर्षांनंतर जिंकला

By admin | Updated: March 30, 2016 00:42 IST

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांनी तक्रारदार सुरेश रामेश्वर सोनी यांना ९० दिवसांच्या आत ‘मेलछाट वस्त्रम’ ही विशेष अर्जित सेवा पूर्वीच्याच जमा

औरंगाबाद : तिरुमला तिरुपती देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांनी तक्रारदार सुरेश रामेश्वर सोनी यांना ९० दिवसांच्या आत ‘मेलछाट वस्त्रम’ ही विशेष अर्जित सेवा पूर्वीच्याच जमा असलेल्या शुल्कावर, अतिरिक्त शुल्क न आकारता उपलब्ध करून द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे.औरंगाबादेतील सुरेश सोनी यांनी तिरुपती देवस्थानातील ‘मेलछाट वस्त्रम’ या विशेष अर्जित सेवेकरिता २० सप्टेंबर २००९ रोजी शुल्क डीडीद्वारे पाठविले होते. त्यांना सदर सेवेची तारीख २१ फेब्रुवारी २०१४ असल्याचे मंदिर प्रशासनाने कळविले होते. सोनी पत्नीसह १९ फेब्रुवारी २०१४ला तिरुपतीला रेल्वेने गेले. तिथे त्यांच्या माहितीची व ओळखपत्राची खात्री करून त्यांच्या अंगठ्याचा ठसा व फोटो घेतला. तपासणी पूर्ण झाल्यामुळे सोनी यांना रामबाग येथे रूम देण्यात आली. सेवेसाठीचे चलनही देण्यात आले. सूचनेनुसार सोनी हे २१ फेब्रुवारी २०१४ रोजी पहाटे २.३० वाजता ‘मेलछाट वस्त्रम’ सेवेसाठी पोहोचले; परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले. तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांसोबत योग्य वेळेत संपर्क साधला नसल्यामुळे ‘ती’ सेवा करता येणार नाही. तक्रारदाराने २५ टक्के जास्तीची रक्कम दिल्यास त्यांना सदर सेवेकरिता पुढील तारीख देता येऊ शकेल, असे सांगण्यात आले. शुल्क भरूनही सोनी यांना सेवेपासून वंचित ठेवल्याबाबत त्यांनी औरंगाबादेतील तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)- गैरअर्जदारांनी तक्रारदारास औरंगाबाद ते तिरुपतीपर्यंत जाण्या-येण्यासाठी यापूर्वी त्यांनी केलेल्या खर्चाच्या भरपाईपोटी ९० दिवसांत ३० हजार रुपये द्यावेत, असेही मंचाने आदेशात म्हटले आहे. तब्बल दोन वर्षांच्या लढ्यानंतर या भाविकाला न्याय मिळाला.