शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला २५ हजारांचा दंड

By admin | Updated: March 4, 2017 03:40 IST

इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, हस्तांतरणपत्र न देता त्रुटीची सेवा देणाऱ्या तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २५ हजारांचा दंड सुनावला

ठाणे : अनेक वर्षे गृहनिर्माण संस्थेला भोगवटा व इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, हस्तांतरणपत्र न देता त्रुटीची सेवा देणाऱ्या तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २५ हजारांचा दंड सुनावला आहे.भार्इंदर येथील बालाजी कॉम्प्लेक्स गृहनिर्माण संस्था असून तिरुपती कन्स्ट्रक्शन्सने ही संस्था असलेली इमारत विकसित केली. त्या इमारतीतील सदनिकाधारकांची संस्था २००६ मध्ये स्थापना करण्यात आली. मात्र, त्यानंतर अनेकदा मागणी करूनही कन्स्ट्रक्शन्सने इमारत व भूखंडाचे हस्तांतरणपत्र तसेच भोगवटा व इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही दिले नाही. गृहनिर्माण संस्थेने कन्स्ट्रक्शन्सला नोटीस देऊन या कागदपत्रांची पूर्तता करावी, अशी मागणी केली. मात्र, नोटीस मिळाल्यावरही कोणतीही कार्यवाही न केल्याने संस्थेने तिरुपती कन्स्ट्रक्शन्सविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. नोटीस कन्स्ट्रक्शन्सला मिळाल्याचा पोस्टाचा पुरावाही गृहनिर्माण संस्थेने मंचासमोर ठेवला. कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता तिरुपती कन्स्ट्रक्शन्सने ५२ सदनिका असलेली ए व बी विंग विकसित करून २००६ मध्ये सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. मात्र, सुमारे १२ वर्षे इतका मोठा काळ जाऊनही तिरुपती कन्स्ट्रक्शन्सने गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीला भोगवटा व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले नाही. तसेच गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यावर चार महिन्यांच्या आत विकासकाने इमारत व भूखंडाचे हस्तांतरणपत्र संस्थेच्या लाभात करून देणे कायदेशीरपणे बंधनकारक आहे. यापैकी कोणतीच बाब अर्थात कागदपत्रे संस्थेच्या लाभात न देता तिरुपती कन्स्ट्रक्शन्सने गृहनिर्माण संस्थेला त्रुटीची सेवा दिली आहे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे बालाजी कॉम्प्लेक्स गृहनिर्माण संस्थेला भोगवटा व इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र द्यावे. तसेच इमारतीचे अभिहस्तांतरण पत्र संस्थेच्या लाभात करून द्यावे आणि तक्रार खर्च म्हणून २५ हजार देण्याचे आदेश मंचाने तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला दिले. (प्रतिनिधी)>52 सदनिका असलेली ए व बी विंग विकसित करून २००६ मध्ये सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. मात्र, सुमारे १२ वर्षे इतका मोठा काळ जाऊनही तिरुपती कन्स्ट्रक्शन्सने गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीला भोगवटा व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले नाही.