शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोळ्या गल्ल्यांतून मार्ग काढणार छोटे बंब

By admin | Updated: November 3, 2016 01:56 IST

अरुंद रस्ते आणि चिंचोळ्या गल्ल्यांतून आगीचे बंब घटनास्थळी नेण्यास अग्निशमन दलास अनंत अडचणी येत असतात.

मुंबई : अरुंद रस्ते आणि चिंचोळ्या गल्ल्यांतून आगीचे बंब घटनास्थळी नेण्यास अग्निशमन दलास अनंत अडचणी येत असतात. यामुळे अग्निशमन दलाची मदत पोहोचण्यास उशीर होऊन अनर्थ ओढावू शकतो. म्हणून आगीचे छोटे बंब आणण्याची कल्पना दोन वर्षांपूर्वी पुढे आली होती. बराच काळ लालफितीत अडकलेला हा प्रस्ताव अखेर नवीन वर्षात मार्गी लागणार आहे. त्यानुसार, मिनी फायर टेंडर म्हणजेच आगीचे छोटे १७ बंब जानेवारीपर्यंत अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत.काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी शहीद झाले. एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या इमारती व अरुंद मार्गामुळे अग्निशमन दलावरच ही आपत्ती ओढावली़ याची गंभीर दखल घेऊन पालिकेच्या विशेष समितीने छोटे अग्निशमन केंद्र उभारण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, आगीचे छोटे बंब खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी पालिका तब्बल ४२ कोटी रुपये खर्च करणार आहे. काळबादेवी दुर्घटनेच्या आधीपासून मिनी फायर टेंडरचा प्रस्ताव चर्चेत होता. मात्र, हा प्रस्ताव प्रत्यक्षात स्थायी समितीपुढे येण्यास दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटला. पहिल्या टप्प्यात तीन छोटे बंब खरेदी करण्यात येणार आहेत. हे बंब चिंचोळ्या गल्ल्यांमधून रस्ता काढू शकतात. झोपडपट्टी व विशेषत: दक्षिण मुंबईतील इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास, या बंबाच्या मदतीने चिंचोळ्या मार्गांतून रस्ता काढणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)छोट्या बंबाचे फायदेअरुंद रस्ते व चिंचोळ्या गल्ल्यातून घटनास्थळी पोहोचू शकेल. या इंजिनमध्ये असलेल्या तंत्रज्ञान आणि उपकरणांमुळे भिंतीसारखा अडथळाही दूर होऊ शकतो. अनेक वेळा आग बंद ठिकाणी लागल्यास ज्वालांपर्यंत पाणी जाण्यास अडथळा येतो. अशा वेळी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. पाणी साठविण्याची क्षमता या इंजिनमध्ये कमी असली, तरी त्यात मोठ्या बंबाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत अग्निशमन दलाच्या ताफ्यात केवळ अडीच हजार अधिकारी व जवान आहेत. ही यंत्रणा तोकडी पडत असून, वाहतुकीची कोंडी, चिंचोळ्या गल्ल्या आणि अरुंद रस्त्यांनी त्यांच्या समस्येत भर घातली आहे. म्हणूनच सहा कमांडिंग सेंटर्स सुरू केल्यानंतर, आता मिनी फायर टेंडर खरेदी करण्यात येणार आहेत.