शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हीच वेळ विदर्भाच्या लढाईची

By admin | Updated: March 27, 2016 03:24 IST

पश्चिम महाराष्ट्रासाठी १०६ लोक हुतात्मे झाल्याचे सांगतात. तुमच्या नाकर्तेपणामुळे विदर्भ-मराठवाड्यातील २९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचे काय, असा सवाल ज्येष्ठ

नागपूर : पश्चिम महाराष्ट्रासाठी १०६ लोक हुतात्मे झाल्याचे सांगतात. तुमच्या नाकर्तेपणामुळे विदर्भ-मराठवाड्यातील २९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचे काय, असा सवाल ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे शनिवारी केला. आम्हाला हिंसक आंदोलन आवडत नाही. कारण त्यात आमचीच मुले मरतात. तेलंगणच्या आंदोलनात १२०० मुलांचा जीव गेला. परंतु विदर्भाच्या निर्णायक लढाईची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.अ‍ॅड. अणे यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर महाधिवक्तापदाचा राजीनामा दिला. पदमुक्त झाल्यावर ते शनिवारी नागपुरात आले. या वेळी विदर्भवादी संघटनांतर्फे संविधान चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आपल्या स्वागताला उत्तर देताना ते बोलत होते.ही अखेरची लढाई नाही, तर शेवट करायला लावणारी लढाई आहे. ती लोकशाही मार्गाने व्हावी, अशी आमची इच्छा आहे. वेळ पडली तर कायदा मोडून सत्याग्रहसुद्धा करू. आम्हाला तेलंगणप्रमाणे हिंसक आंदोलन करायचे नाही. परंतु शासनाने विदर्भाच्या या आंदोलनाला गांभीर्याने न घेतल्यास तसे आंदोलन होणे दूर नाही, असा इशारासुद्धा अ‍ॅड. अणे यांनी दिला. गेल्या ६० वर्षांत पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाचा पैसा चोरून नेला. त्यातूनच पश्चिम महाराष्ट्राचा विकास साधला गेला आणि विदर्भाला मागासलेले ठेवले. १९८६पासून २०१५ पर्यंत दांडेकर समितीचा अभ्यास केल्यास पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाचा पैसा कसा चोरून नेला हे आकडेवारीनुसार दिसून येते.विदर्भ वेगळा झाला तर आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणार नाही, असे बोलले जाते. परंतु विदर्भ वेगळा झाल्यास पश्चिम महाराष्ट्राची वाट लागेल, असे अ‍ॅड. अणे यांनी सुनावले. वैदर्भीय जनतेला हवाय विदर्भ विदर्भाची मागणी ही केवळ नेत्यांची मागणी आहे, ती लोकांची नाही, असे सांगितले जाते. या मागणीला जनतेचा किती पाठिंबा आहे, याचा निकाल जनमंचने घेतलेल्या जनमत चाचणीद्वारे कधीचाच दिला आहे. ९४ ते ९८ टक्केपर्यंत नागरिकांनी विदर्भाच्या बाजूने कौल दिला आहे, असे त्यांनी सांगितले.विदर्भात जात-धर्म व भाषेचे राजकारण नाहीस्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास हिंदी भाषिकांचे राज्य येईल. हिंदी भाषिकांकडून मराठी बांधवांवर अन्याय होईल, असे महाराष्ट्रातील लोक सांगतात. हिंदी-मराठी हा वाद विदर्भात नाही. विदर्भाने कधीच जाती धर्माचे व भाषेचे राजकारण केले नाही. पानठेल्यावर बोलली जाणारी ही आमची मातृभाषा आहे. महात्मा गांधी हे गुजरातमधील आश्रम सोडून विदर्भात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरची निवड केली, ही येथील महानता आहे, हे समजून घेण्याची गरज आहे, असेअ‍ॅड. अणे म्हणाले.पत्रपरिषदेत ‘स्वाभिमानी’ शिरलेअ‍ॅड. श्रीहरी अणे हे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत असताना विदर्भविरोधक असलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे धंतोली येथील टिळक पत्रकार भवनात त्यांचा पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्वाभिमानी संघटनेचे काही कार्यकर्तेही पत्रकार म्हणून घुसले. सायंकाळी ५.३०च्या सुमारास स्वाभिमानीच्या एका कार्यकर्त्याने अणे यांना महाराष्ट्राचे तुकडे करून काय मिळणार, असा प्रश्न विचारला. यावर पत्रकारांनी त्यांना रोखले. पत्रकार नसल्याने तुम्ही प्रश्न विचारू शकत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते विदर्भविरोधी घोषणा देऊ लागले. लगेच विदर्भ समर्थकही स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देऊ लागले. काही वेळ दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होती. आरएसएसमध्ये कधीच नव्हतो राज ठाकरे यांनी केलेले माझा बोलविता धनी कोण हे वक्तव्य मात्र विचार करायला लावणारे आहे. माझे आजोबा हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. विदर्भाच्या मुद्द्यावर काँग्रेसला हरवून ते निवडून आले होते. मी काँग्रेसचा सदस्य नाही. भाजपातही नाही आणि आरएसएसमध्ये तर कधीच नव्हतो, असे अ‍ॅड. अणे यांनी जाहीर केले.