शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

वेळ अतिशय भयंकर आहे, तो कोणाला माफ करत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 01:20 IST

मनुष्य आपल्या शरीरावर अतिशय अभिमान करतो की माझे शरीर अतिशय कणखर आहे.

पुणे- मनुष्य आपल्या शरीरावर अतिशय अभिमान करतो की माझे शरीर अतिशय कणखर आहे. खूप सुंदर आहे. परंतु भगवान महवीर असे म्हणतात, तुम्ही ज्या शरीराला सुंदर आणि मजबूत समजता ते अतिशय कमजोर आहे. एवढ्या मोठ्या शरीराला एक डास चावला की आपण तळमळत उठतो. पायामध्ये छोटासा काटा जरी टोचला तरी वेदनेने आपण घायाळ होतो. तर मग आपण कोणत्या गोष्टीसाठी या शरीराबद्दल अभिमान बाळगतो. एक छोटीशी लाल मुंगी संपूर्ण शरीराला हालवून टाकते. मग आपण या देहावर अभिमान करू नये. जे जीवन जे मिळाले आहे त्याचा क्षणमात्र भरवसा नाही. आता आपण बसलेलो आहोत आणि पुढच्या क्षणी आपेल अस्तित्व असेल की नाही हे सांगता येत नाही. म्हणून परमात्मा असे म्हणतात, की हे देहरूपी शरीर दुर्बल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ अतिशय भयंकर आहे. वेळेची मार कधी कशी पडेल हे सांगता येत नाही. वेळेपुढे रथी-महारथी टिकू शकले नाहीत. तर मग आम्ही अभिमानी का असावे? जेव्हा आम्ही आजारी पडतो तेव्हा आपल्याला सहाय्य करणारे कोणी नसते. जेव्हा आपले हातपाय थकतील, शरीर वृद्धापकाळाने क्षीण होईल तेव्हा आपली सेवा करणारे मिळणे खूप कठीण आहे. ज्या कुटुंबावर आपल्याला खूप अभिमान असतो ते सुद्धा साथ देत नाहीत. मग आपण कोणासाठी व कशासाठी एवढा अभिमान बाळगून असतो. या भूतलावर बऱ्याच अशा व्यक्ती आहेत ज्यांना असे वाटते की आमच्याजवळ पैसा आहे. तर आमच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. परंतु परमात्मा असे म्हणतात, की खुपशा अशा समस्या आहेत की ज्या धनाने मिटू शकत नाहीत. जर एखादे असे आजारपण आले की कितीही पैसा खर्च केला तरी तो आजार बरा होऊ शकत नाही. म्हणून परमात्म्याने मनुष्याचा अभिमान नष्ट करण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले आहे. गंध, रुप, स्पर्श, वर्ण आदी गोष्टी मनुष्याला लगेचच आकर्षित करतात आणि मनुष्य त्याच्याकडे जलद गतीने आकर्षित होतो आणि फसतो. एखादे गाणे वाजू लागले की आपण त्याकडे आकर्षित होतो किंवा चांगला सुंगध आला तरी आपले लक्ष विचलित होते. जिथे आपल्याला सूट (डिस्काऊंट) दिसेल त्याकडे आपण लगेच धावतो आणि आपली फसवणूक होते. मनुष्य असा विचार करतो की समोरचा आपल्या एका गोष्टीवर दुसरी गोष्ट फुकट देत आहे परंतु हे खरे नसते. तर समोरची त्याच किंमतीत दोन्ही वस्तूंच्या पैशांची वसुली करत असतो. अशा मोहात अडकणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेणेच होय. - प. पू. डॉ. समकित मुनीजी म. सा.