शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात यंदा डाळ महागणारच!

By admin | Updated: June 20, 2016 20:28 IST

देशात व राज्यात निश्चितपणे डाळीचा प्रश्न आहे. राज्यात दुष्काळ व अवेळी पावसामुळे डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे डाळ महागणार आहे, असे असले तरी सरकार डाळीच्या दरांवर

गिरीश बापट यांचे स्पष्टीकरण: सरकार दर नियंत्रणासाठी प्रयत्न करणार

औरंगाबाद: देशात व राज्यात निश्चितपणे डाळीचा प्रश्न आहे. राज्यात दुष्काळ व अवेळी पावसामुळे डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे डाळ महागणार आहे, असे असले तरी सरकार डाळीच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करील, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी औरंगाबादेत स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्यावरून शासनाकडे यंदाही डाळींच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या तरी कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याचे स्पष्ट झाले. गिरीश बापट यांनी सोमवारी औरंगाबादेत मराठवाड्यातील पुरवठा विभाग, गोदाम, अन्न सुरक्षा योजनेचा आढावा घेतला. पत्रकारांशी बोलताना बापट म्हणाले, भारतात आफ्रिकन देशांतून डाळ येते. परदेशातील येणाऱ्या डाळींच्या दरावर आपले नियंत्रण राहत नाही. ५ हजार टन साठा हा घाऊक व ५०० टन व्यापाऱ्यांना साठा करण्याची परवानगी राज्यात दिली आहे. भारतात येणारी डाळ समुद्रात बंदरांवर उभी असायची. भाव कमी जास्त झाले की डाळ उतरली जायची. आंध्र, गुजरात, कनार्टकमध्ये डाळ जाते. डाळ जर मुंबईत आली तर त्यातील २० टक्के डाळ या राज्यात दिली जावी. या कायद्याबाबत विचार सुरू आहे. दराचे बंधन घालण्याकरिता कॅबिनेट नोट झाली आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर डाळींचे दर ठरविण्यात येतील. डाळींच्या संदर्भात कोणाची गय करणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांवर कायद्याखाली अटकही करणार असा इशारा दिला. देशभर डाळींच्या किमती वाढल्या आहेत. परदेशात हजारो एकर जमिनीवर डाळ लागवड होत आहे. सरकार तेथील लीजवर जमिनी घेऊन डाळ लावण्याचा विचार करीत आहे. इतर कंपन्या तो प्रकार करीत आहेत. डाळींच्या दरावर लक्ष केंद्रित केले आहे. भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. परदेशासाठी भारत ही डाळीची मोठी बाजारपेठ आहे. रोज दर बदलतात...डाळीचे भाव केव्हा कमी होणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर बापट म्हणाले, मागणी व पुरवठ्यावर डाळीचे दर आहे. सध्या २०० रुपये मॉलमध्ये १५० रुपये बाजारात डाळ मिळते. रोज दर बदलत असल्यामुळे नियंत्रण ठेवता येत नाही. १२० रुपयांचा किमान दर केंद्राने ठरविला आहे. केंद्राने मोठ्या प्रमाणात डाळीचा स्टॉक केला आहे. सर्व राज्यात डाळीचे चणचण आहे. दोन हजार मेट्रीक टन डाळ केंद्र देणार आहे. त्यामुळे डाळीचा साठा राहील. किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहील.