शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
6
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
7
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
8
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
9
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
10
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
11
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
12
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
13
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
14
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
15
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
16
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
17
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
18
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
19
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
20
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

काळ आला होता पण... नंदुरबारमध्ये महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली

By admin | Updated: August 11, 2016 11:20 IST

नंदुरबारमधील नवापूरमधील रंगावली नदीला पूर आल्याने एक एसटी बस वाहून चालली असताना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. ११ - 'काळ आला होता पण वेळ आली होती' अशी आपल्याकडे म्हण आहे, मात्र नंदुरबारमधील नवापूर येथील नागरिकांनी या म्हणीचा अक्षरश: प्रत्यय घेतला. महाडमधील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने दोन एसटी व काही गाड्या वाहू गेल्या व अनेकांनी प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेला आठवडाही उलटत नाही तोच नंदुरबारमधील नवापूरमध्येही अशीच दुर्घटना घडली, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे १७ प्रवाशांचे प्राण वाचले. 
जालना सुरत एस टी बस सूरत कड़े जात असताना नवापुर शहरातून वाहणाऱ्या रंगावली नदीच्या पुरपात्रात पहाटे पाचच्या सुमारास अडकली. बसमध्ये १७ प्रवासी होते. एमएच 20 बी एल 2610 ही एसटी बस रंगावली नदीत वाहून जात होती  हे दिसताच स्थानिकांनी नागरिकांनी आरडाओरड करून मदत मागवली. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवत जेसीबीच्या साहाय्याने बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं.  घटनास्थळी पोलीस अधीक्षक रमेश ड़हाळे व एस टी चे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली. सर्व प्रवाशांना अन्य परळी सुरत या बसमधून सुरतकडे मार्गस्थ करण्यात आले.
गुजरातच्या सीमेलगत असलेल्या अहावा डांग जंगल परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील रंगावली नदीला पूर आला आहे.