शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही शेतकरी अग्रिम बोनसपासून वंचित !

By admin | Updated: January 26, 2016 02:18 IST

खरीप हंगामात शेतक-यांसमोर प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

अकोला: मुख्यमंत्र्यांनी अग्रिम बोनस देण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे प्रचंड आर्थिक निकड असतानाही विदर्भातील शेतकर्‍यांनी कापूस घरी साठवला होता; परंतु अग्रिम बोनस नाही आणि खासगी बाजारात दरवाढही झालेली नसल्याने अखेर शेतकर्‍यांनी संपूर्ण कापूस विकला आहे. या कापसापासून मिळालेल्या रकमेत गेल्यावर्षी पेरणीसाठी घेतलेले साधे कर्जही त्यांना फेडता आलेले नाही. परिणामी या खरीप हंगामात शेतकर्‍यांसमोर प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासन अग्रिम बोनस देणार केव्हा, याकडे अद्यापही शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षी विदर्भातील शेतकर्‍यांनी जवळपास १५ लाख ३0 हजार क्विंटल क्षेत्रावर कपाशीची पेरणी केली होती. पावसाने दगा दिल्याने कापसाचा हेक्टरी दोन-तीन क्विंटल उतारा लागला. कापसाचे उत्पादन जवळपास ५0 टक्क्य़ांनी घटल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आणि हमी दर तोकडा असल्याने उत्पादनखर्च निघणेही कठीण झाले. त्यामुळे शेतकर्‍यांची भिस्त शासनाच्या मदतीवर होती; परंतु शासनाची अग्रिम बोनसची घोषणाही हवेतच विरल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी उत्पादन वाढण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा होती; परंतु पावसाने पाठ फिरवल्याने कापसाचे उत्पादन प्रचंड घटले असून, साधा उत्पादनखर्च निघणे कठीण झाल्याने शेतकर्‍यांना अग्रिम बोनसचाच प्रतीक्षा आहे. गुजरात शासनाने तेथील शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ६00 रुपये बोनस दिल्याने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षी कापसाचा हमी दर ४१00 रुपये प्रतिक्विंटल आहे, पण भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि सीसीआयचा उपअभिकर्ता महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाने कापसाची प्रतवारी बघून प्रत्यक्षात ३८५0 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल या दरानेच कापूस खरेदी केला. त्यामुळे खासगी बाजारातील कापसाचे दर ४१00 ,४२00 वर गेले नव्हते. मागील आठवड्यात कापसाचे दर ४५00 रुपये प्रतिक्विंटलहून वर गेले होते. तथापि, यात चढ-उतार होत असल्याने शेतकर्‍यांनी मात्र कापूस विकायला काढला आहे.