शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

तोंडी तलाकच्या क्रूर पद्धतीचे उच्चाटन होण्याची वेळ- उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 12, 2017 08:03 IST

मुस्लिमांच्या तोंडी तलाक या पद्धतीवर सामनाच्या अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आले आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - मुस्लिमांच्या तोंडी तलाक या पद्धतीवर सामनाच्या अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आले आहेत. तोंडी तलाकच्या क्रूर पद्धतीचे उच्चाटन होण्याची वेळ आता जवळ आली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष डॉ. सय्यद सादिक यांनी तोंडी तलाकसंदर्भात जे ताजे विधान केले ते मुस्लिम महिलांसाठी दिलासादायकच म्हणावे लागेल, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. तोंडी तलाकची पद्धत दीड वर्षात संपुष्टात आणू, असे डॉ. सादिक यांनी जाहीर केले आहे. या भूमिकेचे केवळ मुस्लिम समाजानेच नव्हे तर सर्वधर्मीयांनी आणि सरकारनेही स्वागतच करायला हवे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनीच आजवर तलाक पद्धत रद्द करण्याच्या मार्गात सर्वाधिक अडथळे आणले. तोंडी तलाक कसा योग्य आहे हेच मुस्लिमांना, न्यायालयांना आणि सरकारांना पटवून देण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डावरील मंडळी आजवर नरडी गरम करीत होती. मुस्लिमांच्या शरीयत कायद्यात कोणालाही ढवळाढवळ करू देणार नाही अशी दमबाजीही अनेक वेळा झाली. मात्र याच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष तिहेरी तलाकची पद्धत संपुष्टात आणण्याची भाषा करीत असतील तर या बदलत्या भूमिकेचे स्वागत समाजाने करायलाच हवे, असं मतही अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे. सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे- -मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या उपाध्यक्षांनी तोंडी तलाक दीड वर्षात संपुष्टात आणू अशी भूमिका घेऊन एक पाऊल नक्कीच पुढे टाकले आहे. तमाम मुस्लिम समाजानेही आता याच पावलावर पाऊल टाकून तोंडी तलाक पद्धतीचे समूळ उच्चाटन करायला हवे!-मुस्लिम समाजातील महिलांमध्येच अलीकडच्या काळात तलाकच्या अघोरी प्रथेविरुद्ध जोरदार मंथन सुरू असल्यामुळे हा मुद्दा पुनः पुन्हा ऐरणीवर येत आहे. -तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हणून पत्नीला सोडून देण्याच्या या अमानुष प्रथेने मुस्लिम स्त्रीयांचे आजवर जे शोषण केले ते भयंकर आहे-तोंडी तलाक पद्धत रद्द करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची भूमिका घेणाऱया मुस्लिम समाजातील धुरीणांना बळ देण्याचे कामही आता झाले पाहिजे. -मुस्लिमच पुढाकार घेऊन तलाकची पद्धत घालविणार असतील आणि सुंठीवाचून जर हा खोकला जाणार असेल तर सरकार हस्तक्षेप करायला जाईलच कशाला?- सरकारी हस्तक्षेपाचा फार विचार न करता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सर्वच पदाधिका-यांनीही डॉ. सादिक यांच्या सुरात सूर मिसळून तिहेरी तलाकची अमानवी पद्धत रद्द करण्याची भूमिका जोरकसपणे मांडायला हवी. - या अमानुष पद्धतीमुळे शतकानुशतके मुस्लिम स्त्रीयांनी नरकयातना भोगल्या. अन्याय सहन करीत मुस्लिम महिलांच्या अनेक पिढ्या आजवर अस्तंगत झाल्या. मात्र भविष्यात तरी मुस्लिम स्त्रीयांची या जाचक तलाक पद्धतीतून सुटका व्हायलाच हवी-मुस्लिम समाजातील बुद्धिवंतांनी, विचारवंतांनीदेखील तिहेरी तलाकचा बुरसटलेला विचार झुगारून देण्यासाठी आवाज बुलंद करायला हवा. मुल्ला-मौलवी आणि धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांकडून धर्माच्या नावाखाली होणारे शोषण रोखण्यासाठी शिकल्यासवरल्या पिढीनेदेखील सजग राहायलाच हवे-अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिहेरी तलाकची प्रथा अमानुष असल्याचे मत व्यक्त केले होते. शिवाय शरीयतमध्ये बदल करता येईल काय, असा सवालही न्यायालयाने सरकारला केला होता. सर्वोच्च न्यायालयातदेखील तोंडी तलाकला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका प्रलंबित आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या उपाध्यक्षांनी तोंडी तलाक दीड वर्षात संपुष्टात आणू, अशी भूमिका घेऊन एक पाऊल नक्कीच पुढे टाकले आहे. तमाम मुस्लिम समाजानेही आता याच पावलावर पाऊल टाकून तोंडी तलाक पद्धतीचे समूळ उच्चाटन करायला हवे!